महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी ११ एप्रिल, २०२४ रोजी वयाच्या पंच्याहत्तरीत प्रवेश केला आहे. त्यांचे अमृत महोत्सवी वर्ष वैचारिक मंथन आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरे करण्यात येत आहे. त्यांच्या अमृत महोत्सवांतर्गत वर्षभर होणाऱ्या त्रैमासिक कार्यक्रमांतर्गत दुसरे व्याख्यान ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत प्रा.सुरेश द्वादशीवार यांचे सात ऑक्टोबर २०२४ रोजी व्याख्यान आयोजित केले आहे. ‘चार्वाक ते पानसरे’हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. पेटाळा येथील राम गणेश गडकरी सभागृहात सायंकाळी ५ वाजता कार्यक्रम होणार आहे. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ.प्रमोद मुनघाटे उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान या या व्याख्यानाच्या पूर्वनियोजनाची बैठक नुकतीच झाली. यावेळी अमृतमहोत्सवी समितीचे अध्यक्ष डॉ.जी.पी.माळी, सचिव विश्वास सुतार, सहसचिव संजय कळके, उपाध्यक्ष डॉ.बी.एम.हिर्डेकर, डॉ.प्रवीण चौगले, डॉ.रघुनाथ कडाकणे, प्रा. टी. के. सरगर, प्रा. सी. एम. गायकवाड, समन्वयक सागर बगाडे, प्रा.निशांत गोंधळी, जॉर्ज क्रुझ, दीपक जगदाळे, चंद्रकांत निकाडे, विजय एकशिंगे, आनंद पाटील, महेश सुर्यवंशी, सौ.सीमा सुर्यवंशी, सौ. विद्या नलवडे इत्यादी उपस्थित होते.