Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शक्तीपीठ महामार्गावरुन नेत्यांच्यामध्ये वाकयुद्ध ! राजू शेट्टी, सतेज पाटलांचा सवाल, राजेश क्षीरसागरांचे आव्हान !!घुंगुरमाळा कवितासंग्रहाला कोल्हापूरच्या मातीचा गंध, संस्कृतीचा बाजडीवाय पाटील अभिमत विद्यापीठाला क्यूएस आय-गेज डायमंड मानांकनशक्तीपीठसाठी संवादातून सहमतीचे पाऊल उचलू, शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई : आमदार राजेश क्षीरसागरतर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या विचार कार्यावर  आंतरराष्ट्रीय चर्चासत्रशिक्षणाच्या व्यापक हितासाठी सामूहिक आंदोलनाचा कोल्हापुरी पॅटर्न ! जाचक संचमान्यतेच्या विरोधात पुकारला लढा !!शिवकालीन बारा किल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा मानांकन ! पन्हाळा, रायगड, प्रतापगडचा समावेश शक्तीपीठ महामार्गवरुन शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पसरविण्याचा विरोधकांचा प्रयत्न : आमदार राजेश क्षीरसागरमहानंदा मोहिते यांच्या घुंगुरमाळा कवितासंग्रहाचे शनिवारी प्रकाशनआई अंबाबाई, शक्तिपीठ महामार्ग रद्द होऊ दे ! शेतकऱ्यांची शेती वाचू दे !!

जाहिरात

 

मुस्लिम समाजातर्फे शहरातून शांतता फेरी

schedule19 Sep 24 person by visibility 450 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :   हजरत महंमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर शहरातून  शांतता फेरी काढण्यात आली.या फेरीच्या माध्यमातून मुस्लिम समाजाने, सामाजिक एकात्मता आणि शांततेचा संदेश दिला. 
इस्लाम धर्माचे संस्थापक महंमद पैगंबर यांचा जन्मदिवस, ईद-ए-मिलाद म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त गुरुवारी शहरातून शांतता फेरीचे आयोजन केले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील घुडनपीर दर्गा येथून फेरीला सुरुवात झाली. राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. शहरात ठिकठीकाणी विविध उपक्रम राबविण्यात आले.
ही शांतता फेरी शिवाजी चौक  येथून मार्गस्थ झाली. गुजरीमार्ग बाबुजमाल दर्गा येथे गेल्यानंतर या शांतता फेरीचा समारोप करण्यात आला. हजरत महंमद पैगंबर यांनी जगाला मानवतेची शिकवण आणि शांततेचा संदेश दिला. या निमिताने, देखील शांतता फेरी काढून, एकात्मतेचा आणि शांततेचा संदेश देण्यात आल्याच संयोजकांनी सांगितले.
शांतता फेरीत मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, लियाकत मुजावर, फिरोज सतारमेकर, रशीद काझी, मुस्तफा नुरानी, मुबारक काझी, अल्ताफ काझी, शकील मुतवल्ली, बालम झारी, शाहरुख गडवाले, फिरोज सतारमेकर,  रशीद काजी, मुबारक काझी,अल्ताफ काझी,इरफान शेख, सय्यद पटेल,आसिफ सदरगे,साजिद मकानदार,महंमद छोटू,जमीर मिस्त्री,फायज शिकलगार ,ईद्रीस कच्ची,हर्षद कच्ची, रमजान बेहस्ती, सलमान मौलवी हमीद पाथरवट सहभागी होते. 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes