+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustचंद्रकांत पाटलांची कोल्हापूरसाठी मोठी घोषणा, पुढील शैक्षणिक वर्षापासून फार्मसी कॉलेज !! adjustजागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांत शिवाजी विद्यापीठाचे चौदा संशोधक adjustमुस्लिम समाजातर्फे शहरातून शांतता फेरी adjustस्वच्छता ही सेवा अभियान ! सीईओसह अधिकारी सहभागी !! adjustएनआयटी कोल्हापूरमध्ये कौशल्यपूर्ण अभियंते घडतील - चंद्रकांत पाटील adjustऋतुराज पाटील यांच्याकडून क्षयरुग्णांना पोषण आहार किट adjustआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीचे प्रस्ताव पात्र adjustराष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक सागर बगाडे, विवेक चंदालियांचा शनिवारी नागरी सत्कार adjust ज्येष्ठ विचारवंत सुरेश द्वादशीवार यांचे सात ऑक्टोबरला व्याख्यान adjust कोल्हापूर जिल्ह्यात ३९ कॉलेजमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ! पंतप्रधानांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन
1000926502
1000854315
schedule19 Sep 24 person by visibility 24 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : प्रधानमंत्री टी. बी. मुक्त भारत अभियानातर्गत  आमदार ऋतुराज पाटील यांनी डी.वाय.पाटील ग्रुपच्या माध्यमातून ७२ क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप केले. 
 आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय धोरणात्मक योजनेअंतर्गत २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त भारताचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या उद्दीष्ट्यपूर्तीसाठी राष्ट्रपतींनी ९ सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री टी. बी. मुक्त भारत अभियानाचा शुभारंभ केला. या योजनेअंतर्गत संस्था, उद्योग समुह, व्यक्ती, यांनी क्षयरुग्णांना किमान सहा महिन्यासाठी पोषण आहार किट देऊन 'निक्षय मित्र' बनण्याचे आवाहन करण्यात आले होते.  
  जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. माधव ठाकूर व करवीर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.उत्तम मदने यांच्याकडून केलेल्या आवाहनानुसार डी.वाय.पाटील ग्रुपच्या माध्यमातून आमदार पाटील यांनी ७२ क्षयरुग्णांसाठी पोषण आहार किट उपलब्ध करून दिले आहे. आमदार पाटील यांच्या हस्ते व आरोग्य अधिकाऱ्यांच्या उपस्थित क्षयरुग्णांना हे कीट प्रदान करण्यात आले.

 टी.बी च्या उपचार कालावधीत योग्य पोषण आहार मिळाला नाही तर सकारात्मक परिणाम दिसत नाही. पूर्ण औषधोपचारामुळे व योग्य पोषण आहार यामुळे टी.बी. पूर्णपणे बरा होतो, अशी माहिती आरोग्य विभाग अधिकाऱ्यानी दिली. यावेळी जिल्हा क्षयरोग केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. परवेज पटेल, श्रीमती दिया कोरे, धनंजय परीट, र्डीं. डी. पाटील, एकनाथ पाटील आदी उपस्थित होते.