+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustचंद्रकांत पाटलांची कोल्हापूरसाठी मोठी घोषणा, पुढील शैक्षणिक वर्षापासून फार्मसी कॉलेज !! adjustजागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांत शिवाजी विद्यापीठाचे चौदा संशोधक adjustमुस्लिम समाजातर्फे शहरातून शांतता फेरी adjustस्वच्छता ही सेवा अभियान ! सीईओसह अधिकारी सहभागी !! adjustएनआयटी कोल्हापूरमध्ये कौशल्यपूर्ण अभियंते घडतील - चंद्रकांत पाटील adjustऋतुराज पाटील यांच्याकडून क्षयरुग्णांना पोषण आहार किट adjustआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीचे प्रस्ताव पात्र adjustराष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक सागर बगाडे, विवेक चंदालियांचा शनिवारी नागरी सत्कार adjust ज्येष्ठ विचारवंत सुरेश द्वादशीवार यांचे सात ऑक्टोबरला व्याख्यान adjust कोल्हापूर जिल्ह्यात ३९ कॉलेजमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ! पंतप्रधानांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन
1000926502
1000854315
schedule19 Sep 24 person by visibility 126 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर २०२४ या कालावधीत जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा मोहिम राबविण्यात येत आहे. यामध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर विविध उपक्रमांची जोड दिली आहे. त्या अंतर्गत जिल्ह्यात, गुरुवारी ‘एक दिवस माझ्या गावाच्या स्वच्छतेसाठी – महाश्रमदान’ उपक्रम आयोजित केला होता. करवीर तालुक्यातील उजळाईवाडी ग्रामपंचायत येथील उपक्रमामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिकारी सहभागी झाले.
  स्वच्छता ही सेवा अभियानतंर्गत पंधरवडयात विशेष उपक्रम राबविले जाणार आहेत. या उपक्रमाचा  शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी बोलताना सीईओ कार्तिकेयन एस यांनी, स्वच्छता ही सेवा श्रमदान पंधरावडा म्हणून साजरा न करता जिल्हयातील सर्व गावांनी आणि नागरीकांनी निरंतर स्वच्छतेसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.  उजळाईवाडी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच उत्तम अंबवडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
एक दिवस माझ्या गावाच्या स्वच्छतेसाठी या महाश्रमदान उपक्रमात ग्रामपंचायत उजळाईवाडी येथे विविध उपक्रम राबविणेत आले. यामध्ये गावातून स्वच्छतेची प्रभात फेरी निघाली. स्वच्छता प्रतिज्ञा घेण्यात आली. गावची स्वच्छता करणा-या सफाई कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला. शाळेच्या परिसरामध्ये वृक्षारोपन करण्यात आले. तसेच गावातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता श्रमदान मोहिम झाली. या मोहिमेमध्ये गट विकास अधिकारी विजय यादव, करवीर तालुका आरोग्य अधिकारी उत्तम मदने,  ग्रामविकास अधिकारी सरदार दिंडे, पंचायत समितीतील अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. झाले.
........................................
  अभियानच्या जिल्हा समन्वयक तथा प्रकल्प संचालक माधुरी परीट म्हणाल्या, ‘ स्वच्छता ही सेवा या मोहिमेअंतर्गत स्वच्छतेत लोकसहभाग वाढवीणे, जनजागृती करणे, गावातील कचरा असणारी ठिकाणे निश्च‍ित करुन स्वच्छता करणे, तसेच गावातील सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा, शासकीय इमारती, धार्मिक स्थळे , पर्यंटन स्थळे, तलाव परिसर, मैदाने, शाळा परिसर, गड किल्ले, पाण्याचे स्त्रोत, नदी किनारे यासारख्या ठिकाणी ही स्वच्छता मोहिम राबविणे येणार आहे.  यामध्ये ग्रामीण भागातील कुटुंबांना ग्रामपंचायतीमार्फत एक लाख कापडी पिशवीचे वाटप करणेत येणार आहे. शालेय विद्यार्थांसाठी स्पर्धाचे आयोजन करणे यामध्ये प्लस्टीक ब्रिक्स तयार करणे, टाकाऊ कच-या पासुन टिकाऊ वस्तूची निर्मिती करण्यात येणार आहे.”