+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustचंद्रकांत पाटलांची कोल्हापूरसाठी मोठी घोषणा, पुढील शैक्षणिक वर्षापासून फार्मसी कॉलेज !! adjustजागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांत शिवाजी विद्यापीठाचे चौदा संशोधक adjustमुस्लिम समाजातर्फे शहरातून शांतता फेरी adjustस्वच्छता ही सेवा अभियान ! सीईओसह अधिकारी सहभागी !! adjustएनआयटी कोल्हापूरमध्ये कौशल्यपूर्ण अभियंते घडतील - चंद्रकांत पाटील adjustऋतुराज पाटील यांच्याकडून क्षयरुग्णांना पोषण आहार किट adjustआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीचे प्रस्ताव पात्र adjustराष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक सागर बगाडे, विवेक चंदालियांचा शनिवारी नागरी सत्कार adjust ज्येष्ठ विचारवंत सुरेश द्वादशीवार यांचे सात ऑक्टोबरला व्याख्यान adjust कोल्हापूर जिल्ह्यात ३९ कॉलेजमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ! पंतप्रधानांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन
1000926502
1000854315
schedule19 Sep 24 person by visibility 298 categoryशैक्षणिक
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘कोल्हापूर जिल्हयात पुढील शैक्षणिक वर्षापासून फार्मसी कॉलेज सुरू करू. जिल्हयात शासकीय फार्मसी कॉलेज नाही. लोकांची मागणी विचारात घेत फार्मसी कॉलेज याच जागेत सुरू करु किंवा जिल्हाधिकारी यासाठी नवीन जागा उपलब्ध करून देतील.’असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 
 कोल्हापूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन व शासकीय तंत्रनिकेतन येथील रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थींग्स आणि बहूउद्देशिय संगणक कक्षाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमास खासदार धनंजय महाडिक, तंत्रशिक्षण संचालनालय मुंबईचे संचालक डॉ.विनोद मोहितकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, अधिक्षक अभियंता तुषार बुरूड, सहसंचालक दत्तात्रय जाधव, उपसचिव मोहम्मद उस्मानी, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ.नितीन सोनजे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य एस. के. पाटील  यांची प्रमुख उपस्थिती होती. 
मंत्री पाटील म्हणाले, ‘ भारतामध्ये २०२० साली नवे शैक्षणिक धोरण आले, देशात महाराष्ट्र राज्य नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत आघाडीवर आहे. एकत्रित शिक्षण पद्धतीमुळे आणि संयुक्त विद्यापीठ सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना वेगवेगळे विषय एकत्रित शिकता येणार असून आता अष्टपैलू विद्यार्थी घडतील. मुलांना चांगले शिक्षण मिळाले नाही तर बेरोजगारी वाढेल. महाविद्यालयात वेगवेगळी तांत्रिक उपकरणे, मॉडेल सादर करून प्रदर्शने भरवा, यासाठी सीएसआरची मदत घ्या, जगभरातून वेगवेगळे शिक्षक बोलवा, चांगले क्रीडा स्पर्धांचे आयोजन करा यातून चांगले शैक्षणिक वातावरण तयार होवून मुलांना जगाच्या पाठीवर उभे राहण्यासाठी आधुनिक शिक्षण मिळेल. 
खासदार धनंजय महाडिक यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध केल्याबद्दल आणि मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजना सुरु केल्याबद्दल धन्यवाद दिले. प्रास्ताविकात संचालक डॉ.विनोद मोहितकर यांनी नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या १७५ कोटींच्या नवीन इमारतीची, रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थींग्स आणि बहूउद्देशिय संगणक कक्षाची उपस्थितांना माहिती दिली.