+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule26 Jul 24 person by visibility 119 categoryशैक्षणिक
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीला महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडून "व्हेरी गुड" श्रेणी प्राप्त झाली.  यानिमित्ताने इन्स्टिट्यूटची उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्ता परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
मंडळाच्या शैक्षणिक आवेक्षण (मॉनिटरिंग) समितीने डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट मध्ये तपासणी भेट देऊन शैक्षणिक सुविधा - संसाधने, विद्यार्थी केंद्रित उपक्रम, परीक्षांचे निकाल, प्रयोगशाळांची आधुनिकता, इन्स्टिट्यूटचे दैनंदिन कामकाज आणि प्रशासन, विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटस,अध्ययन प्रक्रियेची पूर्तता, उद्योगस्नेही उपक्रमांद्वारे सामाजिक बांधिलकी, उद्योग क्षेत्राशी सामंजस्य करार, गुणवत्ता सुधारणा उपक्रम, संशोधन क्षेत्रातील सहभाग, इन्स्टिट्यूट मधील वेगवेगळ्या समित्यांचे कामकाज आणि गुणवत्ता, विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास उपक्रम, तज्ञांची व्याख्याने, प्रकल्प सादरीकरण अशा अनेक निकषांवर इन्स्टिट्यूटची तपासणी केली. 
या सर्व निकषांवर इन्स्टिट्यूट अतिशय चांगली कामगिरी करत असल्याचे समितीस दिसून आले. यावेळी इन्स्टिट्यूटमधील सर्व अधिविभागांना समितीने भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. परिणामी, इन्स्टिट्यूटला "व्हेरी गुड" श्रेणी देण्यात आली,असे डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूटचे प्राचार्य वीरेन भिर्डी यांनी सांगितले.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी  कौस्तुभ गावडे यांचे इन्स्टिट्यूटमधील सर्व उपक्रमांना मार्गदर्शन लाभले.