+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule24 Jul 24 person by visibility 148 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  बहुद्देशीय ब्राम्हण संघाच्या पुढाकारातून आरकेनगर येथील देशभक्त रत्नाप्पा कुंभार हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि दप्तर वाटप करण्यात आले. खासदार धनंजय महाडिक, बहुउद्देशीय ब्राह्मण संघचे अध्यक्ष जयंत हरळीकर, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नानासो नष्टे, उपाध्यक्ष महादेव पोवार, सचिव डॉ. सतीश घाळी यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. ६०० विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा फायदा झाला.
 बहुद्देशीय ब्राम्हण संघाची २०१७ मध्ये स्थापना झाली. सर्वांना एकत्र करून, समाजासोबत स्वत:च्या उद्योग - व्यवसायाचा विकास तसंच इतर समाजाला मदतीचा हात देण्यासाठी उपक्रम राबवले असे अवधूत जोशी यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांनी भविष्यात इतरांना मदतीची भावना ठेवावी. त्यामुळं मदतीची साखळी निरंतन राहील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 
स्कॉलरशिप परिक्षेत यश मिळवलेल्या शार्विल ढगे या विद्यार्थ्याचा खासदार महाडिक यांच्या हस्ते रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. 
शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  नष्टे यांनी, या उपक्रमाचं कौतुक केले. तसेच शाळेतील दर्जेदार शिक्षण आणि या शाळेच्या गरजांविषयी मत व्यक्त केलं. यावेळी सचिन जनवाडकर, संजय जोशी, प्रसाद कुलकर्णी, हर्षांक हरळीकर, सौ व्ही पी बिर्जे, दिलीप धर्माधिकारी,  मिलिंद सिन्नरकर,  दिलीप वाडकर, दिलीप धर्माधिकारी,  विशाल दड्डीकर, दिपक देशपांडे, श्रुती जोग आदी उपस्थित होते.