उमेदवारी मागितली नाही, पण संधी दिली तर लढणार - कृष्णराज महाडिक
schedule27 Sep 24 person by visibility 561 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : राज्यातील सत्ताधारी महायुतीचे घटक म्हणून आम्ही सगळेजण एकत्रितपणे कोल्हापूर शहराच्या विकासासाठी काम करत आहोत. सामाजिक कार्याची मला आवड आहे. कोल्हापूर शहराची विकासात्मक वाटचाल व्हावी हा व्यापक विचार डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. त्यामध्ये राजकारणाचा भाग नाही. मी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली नाही, पण वरिष्ठ पातळीवरून आमदारकी लढवण्याची संधी मिळाली तर निश्चितपणे निवडणूक लढवणार " अशी भूमिका यूथ आयकॉन कृष्णराज धनंजय महाडिक यांनी मांडली.
कृष्णराज महाडिक यांनी सरकारकडे पाठपुरावा करून कोल्हापूर शहराच्या रस्ते, गटर्स व इतर विकास कामासाठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. यापैकी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील 27 प्रभागांना 13 कोटी 90 लाख तर कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील समाविष्ट असलेल्या 23 प्रभागांना 11 कोटी दहा लाख रुपयांचा विकास निधी आहे. येत्या महिनाभरात या प्रभागात रस्ते आणि अन्य कामांना सुरुवात करण्याची आपले नियोजन आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे मी आभार मानतो. तसेच खासदार धनंजय महाडिक यांच्या सहकार्यामुळे हा निधी मंजूर होण्यास मदत झाली. माजी आमदार अमल महाडिक, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सत्यजित कदम या साऱ्यांचे सहकार्य मिळाले असेही त्यांनी सांगितले. या निधीतून कोल्हापूर शहरातील विविध भागातील रस्त्यांचे डांबरीकरण, काँक्रिटीकरण, सामाजिक सभागृह, विरुंगळा केंद्र, बगीचा, विद्युत दिवे हायमास्ट व्यायामशाळा अशा पायाभूत सुविधा उभारण्यासाठी विनियोग होणार आहे. याशिवाय कोल्हापूर महापालिकेच्या राजर्षी शाहू जलतरण तलावाच्या दुरुस्तीसाठी आणि सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध झाला आहे. कोल्हापूर शहरातील कचऱ्याच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असेही महाडिक यांनी सांगितले.
आगामी विधानसभा निवडणूक लढवणार का या प्रश्नावर बोलताना कृष्णराज महाडिक म्हणाले, मी खेळाडू आहे. सामाजिक कार्याची मला आवड आहे. विविध सामाजिक उपक्रमांत सहभागी असतो. व्हिडिओ ब्लॉगच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा सामाजिक कामासाठी विनियोग केला आहे. समाजकार्याची आवड आहे. मात्र आपण पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली नाही. महायुतीचे नेते जो उमेदवार देतील त्याच्या विजयासाठी आम्ही प्रयत्न करू. वरिष्ठाने मला निवडणुकीची संधी दिली तर मी निवडणूक लढवणार असेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील कसबा बावडा प्रभागाला 20 लाख, लक्ष्मी विलास पॅलेस प्रभागाला 21 लाख, पोलीस लाईन प्रभागाला एक कोटी 20 लाख , सर्किट हाऊस प्रवाहाला एक कोटी पाच लाख, भोसलेवाडीला एक कोटी दहा लाख, कदमवाडी प्रभागाला 69 लाख, नागाळा पार्क प्रभागासाठी 65 लाख, रमणमळा प्रभागासाठी 50 लाखश, कनाननगर प्रभागासाठी 30 लाख ,शिवाजी पार्क प्रभागासाठी 55 लाख महाडिक वसाहत प्रभागासाठी एक कोटी 46 लाख मुक्त सैनिक वसाहत प्रभागासाठी 48 लाख , साईक्स एक्सटेंशन प्रभागासाठी दहा लाख बिंदू चौक प्रभागासाठी 30 लाख महालक्ष्मी मंदिर प्रभागासाठी पंधरा लाख शिवाजी उद्यम नगर प्रभागासाठी दहा लाख यादव नगर प्रभागासाठी चाळीस लाख, तवनाप्पा पाटणे हायस्कूल प्रभागासाठी 45 लाख, टाकाळा खण प्रभागासाठी 95 लाख, राजारामपुरी एकस्टेशन प्रभागासाठी 85 लाख, कैलासगडची स्वारी मंदिर प्रभागासाठी 35 लाख सिद्धला गार्डन प्रभागासाठी 30 लाख शेंगाळी तालीम प्रभागासाठी १५ लाख रंकाळा स्टॅन्ड प्रभागासाठी दहा लाख पंचगंगा तालीम प्रभागासाठी 35 लाख दुधाळी पॅव्हेलियन प्रभागासाठी 60 लाख बुद्ध गार्डन प्रभागासाठी 35 लाख निधी मिळणार आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघात समाविष्ट टेंबलाईवाडी प्रभागासाठी १५ लाख विक्रम नगर प्रभागासाठी 45 लाख प्रतिबानगर प्रभागासाठी 30 लाख पांजरपोळ प्रभागासाठी 30 लाख तीर्थ वसाहत प्रभागासाठी 50 लाख संभाजीनगर बस स्थानक प्रभागासाठी दहा लाख संभाजी नगर प्रभागासाठी 60 लाख नेहरूनगर प्रभागासाठी एक कोटी चार लाख सुभाष नगर प्रभागासाठी 30 लाख सम्राट नगर प्रभागासाठी एक कोटी 25 लाख शिवाजी विद्यापीठ कृषी महाविद्यालय प्रभागासाठी पंधरा लाख राजेंद्र नगर प्रभागासाठी 35 लाख स्वातंत्र्यसैनिक कॉलनी प्रभागासाठी 50 लाख रामानंद नगर प्रभागासाठी 50 लाख तपोवन प्रभागासाठी पंधरा लाख राज लक्ष्मी नगर प्रभागासाठी 55 लाख फुलेवाडी रिंग रोड प्रभागासाठी 75 लाख साने गुरुजी वसाहत प्रभागासाठी 32 लाख शासकीय मध्यवर्ती कारागृह प्रभागासाठी वीस लाख रायगड कॉलनी प्रभागासाठी 80 लाख सुर्वे नगर प्रभागासाठी 45 लाख कनेरकर नगर प्रभागासाठी 40 लाख तर क्रांतिसिंह नाना पाटील नगर प्रभागासाठी एक कोटीची तरतूद आहे.
[9/27, 6:24 PM] Aapasaheb Mali Daksh Medi: पत्रकार परिषदेला भाजप महिला आघाडीच्या रूपाराणी निकम, स्थायी समितीचे माजी सभापती नंदकुमार मोरे, संजीव निकम, विलास वासकर, किरण शिराळे, बाबा पार्टी, निलेश देसाई, उमा इंगळे, स्मिता माने, किरण नकाते, रविकिरण गवळी, सतीश धरपणकर, उदय शेटके, इंद्रजीत जाधव आदी उपस्थित होते.