+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule17 Jul 24 person by visibility 132 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा आरोग्य कर्मचारी-अधिकाऱ्यांची धन्वंतरी सेवक सहकारी पतसंस्थेतर्फे सभासदांना यंदा १३.५० टक्के लाभांश जाहीर झाला आहे. पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत कोरे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण झाली. आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळाचे उपसंचालक डॉ. दिलीप माने यांच्या हस्ते धन्वंतरीच्या प्रतिमेचे पूजन झाले.
व्यवस्थापक इंद्रजीत आबिटकर यांनी सभेच्या नोटीसीचे वाचन केले. पतसंस्थेचे अध्यक्ष कोरे, माजी अध्यक्ष महेशकुमार देशमुख, संचालक संदीप नाईक यांनी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. सभासद अमर घोलप, नामदेव सोनवणे, रवींद्र परीट यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. सभासदांना १३.५० टक्के लाभांश, थकबाकीचे प्रमाण कमी करणे या कारणास्तव संचालक मंडळाचे अभिनंदन करण्यात आले. उपसंचालक डॉ. माने यांनी पतसंस्थेतर्फे सभासदांना दिल्या जाणाऱ्या सुविधाबद्दल समाधान व्यक्त केले.
सभेला उपाध्यक्षा संध्या महाजन, संचालक डॉ. मिलिंद कदम, विश्वनाथ परमणे, डॉ. फारुक देसाई, पुष्पलता बर्गे, पूजा घाटगे, संभाजी माने, कुमार कांबळे, डॉ. संदीप मिरजकर, मंगल पाटील, शरद बांदिवडेकर, सुनील पाटील, प्राची बोटे, एकनाथ जोशी, सुनीता गडदे, आर. एस. पाटील, पांडूरंग बर्गे, संदीप देसाई, श्रीकृष्ण कुंभार, संध्या कांदणे, सी. पी. शिंदे आदी उपस्थित होते. विलास आळवेकर यांनी स्वागत केले.