+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार
Screenshot_20240226_195247~2
schedule24 Jan 23 person by visibility 482 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : " करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या महिला भाविकांकरिता स्वच्छतागृहांची सुविधा करावी." या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. " पालकमंत्री लक्ष द्या ! महिला भाविकासाठी स्वच्छतागृहाची सुविधा करा !! स्वच्छतागृहाची सुविधा न करणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो"अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी महिला कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांना मागण्यांचे निवेदन दिले.           कोल्हापूरातील अंबाबाई मंदिर येथे महिलांसाठी अनेक वर्षांपासून स्वच्छतागृह नाही. जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन व देवस्थान समितीकडे वारंवार लक्ष वेधूनही त्यांनी सुविधा उपलब्ध केल्या नाहीत. 
पालकमंत्री दीपक केसरकर हे प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदनासाठी उपस्थित राहणार आहेत पण त्याआधी अंबाबाई मंदिर येथे महिलांसाठी स्वच्छतागृह नाही यासंबंधी आत्मचिंतन करावे व स्वच्छता स्वच्छतागृहांच्या सुविधेसंबंधी ठोस पावले उचलावीत.असे म्हटले आहे.
आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, सुनिल मोदी, मंजित माने, शुभांगी पोवार कोथळी, सुरेश पोवार, सुप्रिया पाटील, स्मिता सावंत, पूनम फडतरे, सुशील भांदिगिरे, संतोष रेडेकर, राहुल माळी, विशाल देवकुळे, विवेक काटकर, विराज पाटील, प्रतिज्ञा उतुरे, सविता कानूरकर, राजेंद्र पाटील, वैष्णवी पाटील, लता पाटील, सुनीता नरके, दीपाली शिंदे, शुभांगी पोवार, पोपट दांगट, सोनिया चव्हाण, काजल दुकांडे, सानिका दामुगडे, सिद्धी दामुगडे, मनाली जाधव, गीता हसुरकर, प्रीती क्षीरसागर, कमल पाटील,मंगल पवार, अश्विनी देसाई, आशाताई कदम, माधुरी जाधव, सुरेखा गाडीवडर, संध्या टिपुगडे आदींचा सहभाग होता.