+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule27 Jun 24 person by visibility 214 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : नदीपात्रात सडलेला मृतदेह सापडला. चेहरा सडलेला असल्याने ओळख पटवणे अशक्य होते. मृतदेहावर गोंदन, हातात बांगड्या, ताईत या वस्तू होत्या. तरीही पोलिसांनी नदीच्या आजू बाजूचा परिसर पिंजून काढत खुनाचा यशस्वी तपास केला. आरोपींना अटक केली आणि त्यांच्याकडून १५ लाख ४० हजार रुपये जप्त केले. शिरोळ तालुक्यातील कवठेसार येथे वारणा नदीच्या पात्रात २१ जून रोजी बारदानात बांधलेला महिलेचा सडलेला मृतदेह मिळाला. चेहरा सडलेला असल्याने पोलिसांना ओळख पटवणे अशक्य होते . उजव्या हातावर राम-लक्ष्मण जोडी, बाशिंगांचे गोंधन होते. तसेच गळ्यात दोन तावीज तर हातात बांगड्या कंडे होते. पोलिसांनी मृतदेहाच्या फिंगरप्रिंट घेतल्या पण मॄतदेह सडलेला असल्याने फिंगरप्रिंट मिळाल्या नाहीत. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग ,जयसिंगपूर पोलीस ठाणे आणि इचलकरंजी पोलिसांना या गुन्ह्याचा तपास करण्याचा आदेश दिला.  
   पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी नदीच्या दोन्ही बाजूच्या कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील गावांमध्ये तपास सुरू केला. परिसरातील मंदिर, दर्गे येथील सीसीटीव्ही तपासले पण पोलिसांना माहिती मिळाली नाही. २६ जून रोजी पोलिसांना एक गोपनीय माहिती मिळाली. चंदुर येथील एक वयस्कर मुस्लिम महिला गेले दहा दिवस दिसून येत नव्हती अशी माहिती मिळाली. पोलिसांनी त्या महिलेच्या नातेवाईक आणि शेजाऱ्यांच्याकडे चौकशी केली. नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीमध्ये संदिग्धता दिसून आली. पोलिसांनी प्रकाश चव्हाण (रा. चंदुर) याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता गुन्ह्याचा तपास लागला. संशयित प्रकाश चव्हाण याची मावशी जहिरा बेगम मोहम्मद युसुफ खान (वय ६४. रा. नागपाडा मुंबई) गेले एक वर्षांपूर्वी प्रकाश चव्हाण यांच्याकडे राहायला आली होती. जाहिरा बेगम ही मुळची कर्नाटकातील बागलकोट या गावची होती. तिचे नाव शिवाली राठोड होते. ती वडिलांसमवेत चंदुर येथे राहायला आली होती. तिने वीस वर्षांपूर्वी प्रेम विवाह करून मुंबईला पती समवेत नागपाडा येथे राहत होती अडीच वर्षांपूर्वी पतीचे निधन झाले.
 जहिरा बेगम नागपाडा मधील ज्या खोलीत राहत होती. तिने खोली विकून २८ लाख रुपये घेऊन ती बहिणीचा मुलगा प्रकाश चव्हाण यांच्याकडे राहायला आले. जहिरा बेगम ही वृद्ध असल्याने तिचा त्रास प्रकाश चव्हाण यांच्या घरच्यांना होत होता. तसेच खोली विकून मिळालेले पैसे तिच्याकडे होते .हे पैसे आपल्याला मिळावेत म्हणून प्रकाश चव्हाण याने मावशी जाहिरा बेगमीचा खून करण्याचा कट नसला. ११ जून रोजी मावशी जहिरा बेगमीला झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर तिचा गळा आवळून खून केला. तिचा मृतदेह एका बारदानात बांधून मित्र राजू नायक याला बोलावून घेतले. दोघांनी मिळून मोटरसायकल वरून बारदानात बांधलेला मृतदेह कुंभोज दुधगाव रस्त्यावरील वारणा नदीच्या पात्रात टाकला. पोलिसांनी या गुन्ह्याचा यशस्वीपणे तपास करून प्रकाश सोम्मप्पा चव्हाण (वय ३७, रा. चंदुर) आणि राजू वाकप्पा नायर (रा. इचलकरंजी )या दोघांना अटक केली. अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सत्यवान हाके ,सायबर चे पोलीस निरीक्षक अतिश म्हेत्रे , हवालदार प्रकाश पाटील, सतीश जंग,म प्रशांत कांबळे ,संजय इंगवले, अमित सर्जे, महेश खोत ,राजेंद्र कांबळे, रफिक आवळकर ,यशवंत कुंभार ,अयुब गडकरी, संजय पडवळ जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील अमोल अवघडे, गावभाग पोलीस ठाण्याचे शिवानंद पाटील, जयदीप बागडे, विक्रम पाटील यांनी तपासात भाग घेतला.