+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustग्रंथ जगण्याची प्रेरणा देतात - समीर देशपांडे adjustकृष्णराज महाडिक उगवता सूर्य, आज ना उद्या नक्की दिवस उगवणार ! अपेक्षा न करता, आपण काम करत करायचं !! adjustकेएमसी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन adjustप्रख्यात भूलतज्ज्ञ डॉ. शकील मोमीन यांना जीवनगौरव पुरस्कार, केएमएतर्फे वीस ऑक्टोबरला वितरण adjustजितो कोल्हापूरचा पदग्रहण समारंभ दिमाखात ! अध्यक्षपदी रवी संघवी, मुख्य सचिवपदी अनिल पाटील, खजानिसपदी सिताराम कोरडे !! adjustकोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे दोन दिवसीय केएमए-कॉन परिषद adjust दूध विक्रीत गोकुळचा नवा उच्चांक , कोजागिरीनिमित्त 18 लाख 65 हजार लिटर दूध विक्री adjustकोरे अभियांत्रिकीतील प्राध्यापकांना भारत सरकारचे कॉपीराईट नोंदणी प्रमाणपत्र adjustदेशमुख शिक्षण समूहात विजेत्या शिक्षकांचा सत्कार adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वतर्फे हेल्पर्समधील दहा शिक्षकांचा सन्मान
1001130166
1000995296
schedule14 Jul 24 person by visibility 216 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भक्तीचा भाव जागविणाऱ्या संताच्या रचना, भक्तीगीतांना गायक-कलाकारांनी चढविलेला सुरेल स्वरसाज, सोबतीला टाळ-मृदुंगांचा ताल आणि विठू नामाचा गजर अशा वातावरणात शनिवारच्या सायंकाळी रंगलेल्या संगीत मैफलीतून रसिकांनी पंढरीची वारी अनुभवली. जवळपास अडीच तास रंगलेल्या या भावभक्तीमय कार्यक्रमात कलाकारांसोबत रसिक प्रेक्षकांनीही, ‘विठ्ठल, विठ्ठल’ असा ठेका धरला. हा माहौल पाहून पंढरीचा महिमा वर्णावा किती अशी भावावस्था निर्माण झाली.
येथील गुणीदास फाऊंडेशनतर्फे आषाढी एकादशीनिमित्त आयोजित ‘तीर्थ विठ्ठल’ भक्तीसंगीत मैफल भरविली होती. कोल्हापुरातील उद्योजक कै. बापूसाहेब जाधव यांच्या स्मरणार्थ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे आयोजित या मैफलीला रसिकांनी तुडुंब गर्दी केली होती. पावसाच्या हलक्या सरींनी प्रफुल्लित बनलेल्या वातावरणात गायक मंगेश बोरगावकर, स्वरांगी मराठी यांनी ‘जय जय राम कृष्ण’चा गजर करत भक्तीरसाचा शिडकावा केला. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत जनाबाई, संत सेना महाराज, संत चोखामेळा यांच्या अभंग सादर करत कलाकारांनी ही मैफल उत्तरोत्तर रंगवत नेली.
मंगेश बोरगावकर यांनी, ‘सुंदर ते ध्यान उभे विठेवरी’हा अभंग सादर करत विठुरायाच्या मोहक रुपाचे दर्शन घडविले. स्वरांनी मराठे यांनी, ‘सदा माझे डोळा, जडो तुझी मूर्ती’ या अभंगातून भावभक्ती प्रकट केली. संत सेना महाराज यांच्या ‘जीवनात एकदा तरी जा पंढरीला, नाचा महाद्वारी, देवा पुढे‘हा अभंग सादर करत कलाकारांनी पंढरीचा महिमा वर्णिला. स्वरांगी मराठे यांनी, ‘बोलावा विठ्ठल- पाहावा विठ्ठल, रुप पाहता लोचनी’ सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात गायक कलाकारांनी, ‘अवघे गर्जे पंढरपूर, अबीर गुलाल उधळीत, कानडा राजा पंढरीचा’ ही भक्तीगीते सादर करत कार्यक्रम संस्मरणीय केला.
…………………………………
कलाकार-स्थानिक वादकांचा सत्कार
कार्यक्रमाच्या प्रारंभी उद्योजक कै. बापूसाहेब जाधव, गुणीदास फाऊंडेशनचे अध्यक्ष कै. शिरीष सप्रे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. दरम्यान या संगीत मैफलीला स्थानिक वादकांची साथ लाभली. राजप्रसाद धर्माधिकारी यांनी तबला, रोहित खवाळे यांनी मृदंग, सचिन जगताप यांनी बासरी, केदार गुळवणी यांनी व्हायोलिन, विक्रम पाटील, स्वरुप दिवाण यांनी हार्मोनियमची साथ संगत केली. याप्रसंगी उद्योजक भरत जाधव, प्रिया जाधव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार झाला. गुणीदास फाऊंडेशनचे दिलीप बनछोडे, आदित्य जाधव, अभय देशपांडे, अजित शुक्ल, अरविंद लाटकर आदी उपस्थित होते.