+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule21 Jul 24 person by visibility 106 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कसबा बावडा येथील डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग विभागाच्या तीन विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील नामांकित विद्यापीठात निवड झाली आहे. 
महाविद्यालयाच्या  कशिश ललवानीची विविध पाच विद्यापीठांमध्ये निवड झाली असून सोबत मानाची शिष्यवृत्ती मिळाली आहे. कशिश हीची जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठाचे "ग्लोबल लीडर्स अवॉर्ड" आणि १७,१०० डॉलर शिष्यवृत्ती, ⁠युनिव्हर्सिटी ऍट बफेलो ⁠स्टीव्हन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे "मास्टर्स स्कॉलरशिप अवॉर्ड" आणि २५ हजार डॉलर्स शिष्यवृत्ती ,⁠युनिव्हर्सिटी ऍट अल्बानी येथे "डीन मेरिट अवॉर्ड" आणि प्रति सेमेस्टर २५०० डॉलर्स शिष्यवृत्ती, आणि स्टोनी ब्रूक आणि स्टीव्हन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विद्यापीठ येथे प्रवेश मिळाला आहे. महाविद्यालयाचा “सर्वोत्तम विद्यार्थिनी” पुरस्काराने सन्मानित कशिश हीने न्यूयॉर्क, यूएसए येथील “स्टोनी ब्रूक” विद्यापीठात डेटा सायन्समध्ये मास्टर ऑफ सायन्स (एम. एस.) करण्याचा निर्णय घेतला आहे. 
   स्मित नलावडे याची स्टीवन्स इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलोंजि हॉबोकेन न्यु जर्सी येथे निवड झाली आहे, त्याला १०हजार डॉलर्स शिष्यवृत्ती मिळाली आहे. तर प्रसाद बापट याची निवड बुफ्फालो युनिव्हर्सिटी, न्युयार्क, यु.एस.ए.येथे झाली असून डेटा सायन्समध्ये मास्टर ऑफ सायन्स (एम. एस.) करणार आहेत. 
डी.वाय. पाटील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयतून बी.टेक. इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग विभागाच्या पाहिल्याचं २०२०-२४ बॅचच्या या घवघवीत यशामुळे महाविद्यालयाच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कमोर्तब झाले आहे. या विद्यार्थ्यांना विभागप्रमुख डॉ.सिद्धेश्वर पाटील आणि विभागातील शिक्षकाचे मार्गदर्शन लाभले. 
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज संजय पाटील, कार्यकारी संचालक डॉ.अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ.संतोष चेडे आणि रजिस्ट्रार डॉ.लितेश मालदे यांनी अभिनंदन केले.