Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आयुक्तांनी केली रस्ते कामाची पाहणी, अधिकाऱ्यांसह ठेकेदारांना सक्त सूचनापूरग्रस्तांना मदत, विवेकानंद कॉलेजचा पुण्यात सन्मान ! उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून गौरव!!रिंगरोडला महापालिकेतर्फे हॉस्पिटल, झूम प्रकल्प येथे सीएनजी गॅस प्रकल्प ! अमल महाडिकांची अधिकाऱ्यांसोबत चर्चाजिल्ह्यात तीस हजाराहून अधिक घरकुलांचे काम सुरू ! डिसेंबर अखेर ५० हजार घरकुलासाठी मोहिम ! !आठ महिने उलटले, सिनेट सभा नाही ! नियमांचे उल्लंघन,  प्रशासनाची चालढकल ! !कागलमध्ये राजकीय घमासान, मंडलिक-मुश्रीफांत हल्लाबोलमेन राजारामच्या विजयी खेळाडूंची वाजतगाजत मिरवणूक ! स्वागताला अधिकारी !!महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी शेंडा पार्कात जागा मंजूर, पाच एकर जागा उपलब्धवारसा हा दगड विटांचा समूह नसून अस्मितेचे प्रतीक - नंदिता घाटगेकागलात नवे राजकारण,  मंडलिकांना आबिटकरांची ताकत ! मुश्रीफ-समरजितराजेंच्या आघाडीला आव्हान ! !

जाहिरात

 

आयुक्तांनी केली रस्ते कामाची पाहणी, अधिकाऱ्यांसह ठेकेदारांना सक्त सूचना

schedule21 Nov 25 person by visibility 21 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : नगरोत्थान योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी पाहणी केली. यामध्ये जरगनगर परिसर रस्ता, रसिका हॉटेल शेजारील रस्ता तसेच निर्माण चौक ते रामानंदनगर–जरगनगर हा महत्त्वाचा असलेला रस्ताचा समावेश होता. तसेच  पंचगंगा स्मशानभूमी परिसरात सुरू असलेल्या कामांची, शेणी व लाकडाच्या साठ्याची पाहणी केली. मागील सहा महिन्यांचे सर्व रेकॉर्ड तपासण्याच्या सूचना केल्या. तसेच स्मशानभूमीच्या विस्तारीकरणाच्या कामाचीही पाहणी केली.

 दरम्यान रस्त्यांवरील कामामध्ये ठेकेदाराने केवळ बाजूपट्टीचे खडीकरण करून काम थांबविले असल्याचे आढळून आले. याबाबत नाराजी व्यक्त करत प्रशासकांनी उर्वरित रस्त्याचे काम तातडीने आजच सुरू करण्याच्या सूचना केल्या. तसेच रामानंदनगर परिसरात सुमारे ६०० मीटरपर्यंतचे बाजूपट्टीचे काम तातडीने सुरू करता येऊ शकते, त्यामुळे ते काम प्रथम प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. यासोबतच या मार्गावरील पोल शिफ्टिंग तसेच रस्त्यावर अडथळा निर्माण करणारी झाडे हटविण्याची कामे सुरु करण्याबाबतही सूचना दिल्या. सायंकाळी संबंधीत ठेकेदाराने या ठिकाणी सर्व यंत्र सामुग्री आणून संबंधीत रस्तेच काम सुरु केले आहे.

यानंतर प्रशासकांनी रसिका हॉटेल शेजारील अठरा मीटरच्या रस्त्याची पाहणी केली. याठिकाणी रस्त्यावर असलेली अतिक्रमणे व बाधीत होणा-या मिळकती ताब्यात घेण्यासाठी नगररचना विभागामार्फत नोटीस देण्याच्या सूचना दिल्या.  रसिका हॉटेल ते सफायर पार्क अमृत 2 अंतर्गत मंजूर ड्रेनेजची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश सहायक आयुक्तांना दिले. या पाहणीदरम्यान अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, सहा. आयुक्त कृष्णा पाटील, उद्यान अधीक्षक समीर व्याघ्रांबरे, कनिष्ठ अभियंता सागर शिंदे, आरोग्य निरीक्षक सुशांत कांबळे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes