+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule15 Jul 24 person by visibility 146 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या विरोधात १९ गावांनी दिलेल्या बंदच्या हाकला प्रतिसाद मिळाला. रविवारी, (१४ जुलै) गावातील दुकाने, हॉटेल बंद ठेवून हद्दवाढीला विरोध असल्याचे दाखवून दिले. हद्दवाढ विरोधी सर्व पक्षीय कृती समितीने बंद पुकारला होता. हद्दवाढीला विरोध करण्यासाठी पुकारलेला हा बंद यशस्वी ठरल्याचा दावा कृती समितीने केला आहे.
शिरोली, गोकुळ शिरगाव, पाचगाव, उचगाव, मुडशिंगी, कळंबा, मोरेवाडी, गांधीनगर, वळीवडे, सरनोबतवाडी, वडणगे, आंबेवाडी, पीरवाडी, नवे बालिंगे, कंदलगाव, न्यू वाडदे, उजळाईवाडी, नागाव, नागदेववाडी आदी गावात सकाळपासूनच बंद पुकारला होता. गावातील व्यवहार बंद ठेवले होते. औषध दुकाने वगळता अन्य दुकाने, शोरुम्स्, हॉटेलचे शटर डाऊन राहिले. बंदमध्ये लहानसहान व्यावसायिक, व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला.
१९ गावातील ग्रामपंचायत सदस्यांनी आपआपल्या गावात प्रमुख चौकात येत हद्दवाढीला विरोध दर्शविला. नागरिकही ‘मातीशी इमान राखणार आहोत-हद्दवाढीला गाडणार आहोत, हद्दवाढ रोखू या –भस्मासूर थांबवू या, ’ या आशयाचे फलक हाती घेऊन रस्त्यावर उतरले होते. गावातून निषेध फेरीही काढण्यात आली. या आंदोलनासंबंधी हद्दवाढ विरोधी कृती समितीचे अध्यक्ष व उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण म्हणाले, ‘हद्दवाढीच्या विरोधात १९ गावांत पुकारलेला बंद शंभर टक्के यशस्वी झाला. गावा-गावात हद्दवाढीच्या विरोधात निषेध फेरी काढण्यात आली. गावकऱ्यांनी सगळे व्यवहार बंद ठेवत हद्दवाढीच्या विरोधात भूमिका स्पष्ट केली
…………………………………………………….
गाव बंदचे आंदोलन हे हद्दवाढीच्या विरोधातील पहिले पाऊल आहे. प्रशासनने ग्रामीण भागातील जनतेच्या भावना लक्षात घ्याव्यात. पुढील टप्प्यात तीव्र स्वरुपात आंदोलन करू. जबरदस्तीने निर्णय लादण्याचा प्रकार घडला तर प्रशानन व लोकप्रतिनिधींना परिणाम भोगावे लागतील.
तानाजी पाटील, उपसरपंच गडमुडशिंगी
……………………………………………………………
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पहिल्यांदा कोल्हापूर शहराचा विकास करुन दाखवावा. शहरालगतच्या गावांचा हद्दवाढीत समावेश करु नये. गावचा विकास साधण्यासाठी ग्रामपंचायती सक्षम आहेत. हद्दवाढ विरोधी कृती समितीने पुकारलेल्या १९ गावातील बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
नारायण गाडगीळ, उपाध्यक्ष हद्दवाढ विरोधी कृती समिती
………………………………………………………………………………………
प्रस्तावित हद्दवाढीच्या विरोधात पुकारलेल्या गाव बंद आंदोलनाला मोठा प्रतिसाद लाभला. गावातील सगळे व्यवहार बंद ठेवत गावकऱ्यांनी सहभाग नोंदविला. गावकऱ्यांची भूमिका प्रशासन व राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यावी.
चंद्रकांत प्रकाश डावरे, सरपंच गोकुळ शिरगाव
……………………………
गाव बंद आंदोलनातून ग्रामीण भागातील लोकांचा हद्दवाढीला विरोध स्पष्ट झाला. महापालिका शहरवासियांना मुबलक सोयी सुविधा पुरविण्यात कमी पडत आहे. उपनगरांची अवस्था दयनीय आहे. याउलट ग्रामपंचायती या सक्षमपणे गावचा कारभार करत आहेत. विविध योजनेतून ग्रामविकास साधत आहेत.
पदमजा करपे, सरपंच शिरोली
……………………………….