Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कौस्तुभ गावडे, स्मिता जाधवांच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील मैदानात ! कोल्हापुरात मतदारांशी थेट संपर्क !!डिजिटल इम्युनिटी उपक्रम टप्प्याटप्प्याने राज्यात राबविणारमहाविकास आघाडीचे पदवीधर – शिक्षकचे उमेदवार कर्तृत्ववान - खासदार सुप्रिया सुळेराज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहनएआयच्या युगात वाचनसंस्कृती जपणे काळाची  गरज : डॉ. युवराज दीक्षितमंत्र्यांचे विधान चर्चेत, खोटं बोललं की देवी अंगावर उठते ! महायुतीचे नेते सौंदत्ती डोंगरावर, ठरावधारकांचा मेळावा अन् यल्लम्मा देवीची शपथ !!छछ डडशिवाजी विद्यापीठाच्या ४६ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचे जनरल चॅम्पियनशीप विवेकानंद कॉलेजकडेप्रा. भारती भाविकट्टी यांना शिवाजी विद्यापीठाची पीएचडीजिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेत डीआरके कॉलेजची प्राजक्ता रणदिवेचे यश

जाहिरात

 

कौस्तुभ गावडे, स्मिता जाधवांच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील मैदानात ! कोल्हापुरात मतदारांशी थेट संपर्क !!

schedule17 Oct 26 person by visibility 32 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : पुणे विभागीय पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा प्रचार आता वेगावला आहे. या मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कौस्तुभ गावडे व डॉ स्मिता जाधव यांच्या प्रचारासाठी उच्च उत्तम प्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आता मैदानात उतरले आहेत. मंत्री पाटील यांनी कोल्हापुरात थेट मतदार असे संपर्क साधत गावडे व जाधव यांना निवडून देण्याचे आवाहन केले.

 कोल्हापुरात घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी मतदारांना मतदान प्रक्रियेची माहिती देत मतदान करण्याचे आवाहन केले.या प्रचार मोहिमेदरम्यान भाजपचे कोल्हापूर शहराध्यक्ष विजय जाधव, राहुल चिकोडे आणि आप्पा लाड उपस्थित होते.

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचत असताना, मंत्री पाटील यांनी मतदारांच्या भेटीगाठींवर भर दिला. घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधत त्यांनी मतदानाचे महत्त्व पटवून दिले. तसेच, मतदारांना मतदान प्रक्रियेचे प्रात्यक्षिक देऊन मतदान करताना घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes