Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मंत्र्यांचे विधान चर्चेत, खोटं बोललं की देवी अंगावर उठते ! महायुतीचे नेते सौंदत्ती डोंगरावर, ठरावधारकांचा मेळावा अन् यल्लम्मा देवीची शपथ !!छछ डडशिवाजी विद्यापीठाच्या ४६ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचे जनरल चॅम्पियनशीप विवेकानंद कॉलेजकडेप्रा. भारती भाविकट्टी यांना शिवाजी विद्यापीठाची पीएचडीजिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेत डीआरके कॉलेजची प्राजक्ता रणदिवेचे यशकौस्तुभ गावडेंचा सोलापुरात प्रचाराचा धडाका, माळशिरसमध्ये मेळावा !महायुतीच्या नेत्यांची एकजूट अधोरेखित! ! पदवीधरांच्या प्रश्नासाठी लढणारा मी कार्यकर्ता, राष्ट्रवादीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकावर ढकलूमहाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचा कौस्तुभ गावडेंना पाठिंबाना कुटंबांतील सदस्याला उमेदवारी…ना स्वीकृत संचालकपदासाठी नातेवाईकांची दावेदारी ! कार्यकर्त्यांना सोबत घेऊन गोकुळची लढाई !!महायुतीचे दोन्ही उमेदवार अभ्यासू, शिक्षणाविषयी तळमळ असणारे !  पहिल्या फेरीत विजयी करूया !! हसन मुश्रीफ

जाहिरात

 

मंत्र्यांचे विधान चर्चेत, खोटं बोललं की देवी अंगावर उठते ! महायुतीचे नेते सौंदत्ती डोंगरावर, ठरावधारकांचा मेळावा अन् यल्लम्मा देवीची शपथ !!

schedule16 Oct 26 person by visibility 212 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गोकुळमध्ये सत्ता मिळवण्यासाठी नेते मंडळी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. निवडणुकीत क्रॉस व्होटिंग आणि दगाफटका होऊ नये म्हणून महायुतीच्या नेतेमंडळींनी कमालीची सतर्कता बाळगली आहे. शुक्रवारी १६ ऑक्टोबर २०२६ रोजी महायुतीच्या काही नेते मंडळींनी सौंदती डोंगर येथे जाऊन यल्लमा देवीचे दर्शन घेतले. ओटी भरली. तसेच शपथ घेतली. देवीचे दर्शन घेण्यापूर्वी, येथे ठरावधारकांचा मेळावा झाला. शपथ घ्यायला जग आणि परडी कार्यक्रमस्थळी आणली होती. ठरावधारकांना शपथ देण्यात आली. ‘२५ मते महायुतीला देणार, कपबशीला मतदान करणार.’

मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजय घाटगे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत, जिल्हा मध्यवर्ती बँकेचं संचालक भैया माने, गोकुळ निवडणुकीतील उमेदवार नविद मुश्रीफ, अंबरिश घाटगे, युवराज पाटील, विरेंद्र मंडलिक, शशिकांत खोत आदींनी देवीचे दर्शन घेतले. तत्पूर्वी येथे झालेल्या मेळाव्यात मंत्री मुश्रीफ व खासदार महाडिक यांनी मार्गदर्शन केले.

या मेळाव्याला ठरावधारक कुटुंबासहित उपस्थित होते. मंत्री मुश्रीफ ठरावधारकांना उद्देशून म्हणाले की, ‘ निवडणुकीतील दगाबाजीचा फटका गरीब उमेदवारांना होतो. त्यांची आर्थिक धूळदाण होते. हे टाळयासाठी आपण साऱ्यांनी पॅनेल टू पॅनेल मतदान करायचे. माझ्यासहित साऱ्यांनी शपथ घ्यायची. मी शपथ घेतो की निवडणुकीत गद्दारी करणार नाही. २५ मते कपबशीला देणार.  कागलची अब्रू वाचवा, तुम्हाला आमची शपथ आहे. यल्लमा देवी जागृत आहे, खोटं बोललं की देवी अंगावर उठते.’अशी शपथ घेण्यात आली. माजी खासदार महाडिक म्हणाले, ‘ गोकुळची निवडणूक ही नावाजलेली दूध संस्थेची निवडणूक आहे. महायुतीला कोणीही गालबोट लावू नका. नेतेमंडळींना धोका होता कामा नये.सगळयांच्या अगोदर आम्हीही शपथ घेणार आहे. नेतेमंडळी, उमेदवारांची जबाबदारी आहे. शपथ एवढीच घ्यायची आहे की, रविवारी होणाऱ्या गोकुळच्या निवडणुकीसाठी २५ पैकी २५ मते मी कपबशीला देणार आहे. राज्यपातळीवर नेत्यांची कॉलर ताठ असली पाहिजे’

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes