Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
छछ डडशिवाजी विद्यापीठाच्या ४६ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचे जनरल चॅम्पियनशीप विवेकानंद कॉलेजकडेप्रा. भारती भाविकट्टी यांना शिवाजी विद्यापीठाची पीएचडीजिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेत डीआरके कॉलेजची प्राजक्ता रणदिवेचे यशकौस्तुभ गावडेंचा सोलापुरात प्रचाराचा धडाका, माळशिरसमध्ये मेळावा !महायुतीच्या नेत्यांची एकजूट अधोरेखित! ! पदवीधरांच्या प्रश्नासाठी लढणारा मी कार्यकर्ता, राष्ट्रवादीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकावर ढकलूमहाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचा कौस्तुभ गावडेंना पाठिंबाना कुटंबांतील सदस्याला उमेदवारी…ना स्वीकृत संचालकपदासाठी नातेवाईकांची दावेदारी ! कार्यकर्त्यांना सोबत घेऊन गोकुळची लढाई !!महायुतीचे दोन्ही उमेदवार अभ्यासू, शिक्षणाविषयी तळमळ असणारे !  पहिल्या फेरीत विजयी करूया !! हसन मुश्रीफपदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीत वाद, शिवसेना ठाकरे पक्षाचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षावर हल्लाबोल ! ठाकरेंचे फोटो वापरल्यास कायदेशीर कारवाई ! !

जाहिरात

 

प्रा. भारती भाविकट्टी यांना शिवाजी विद्यापीठाची पीएचडी

schedule16 Oct 26 person by visibility 43 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगलीयेथील सूक्ष्मजीवशास्त्र विषयाच्या विभागप्रमुख भारती काडसिद्धेश्वर भाविकट्टी (मठपती) यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्याकडून नुकतीच सूक्ष्मजीवशास्त्र विषयातील पीएचडी प्राप्त केली. त्यांनी 'क्षारयुक्त आणि दुष्काळी भागातील जमिनीतील फॉस्फेट व सिलिकेटचे  विघटन करणाऱ्या जीवाणूंवर अभ्यास करून  विद्यापीठास प्रबंध सादर केला होता. पर्यावरणातील प्रतिकूल परिस्थितीचा अशा उपयुक्त जीवाणूंवर होणाऱ्या परिणामाचा सखोल अभ्यास त्यांनी आपल्या संशोधनातून केला असून  यासाठी त्यांना विलिंग्डन महाविद्यालयाचे माजी विभागप्रमुख डॉ. एस. व्ही. सुपनेकर यांचे मार्गदर्शन लाभले. भारती विद्यापीठाचे कार्यवाही डॉ. विश्वजित कदम तसेच शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा श्रीमती विजयमाला कदम यांचे त्यांना प्रोत्साहन लाभले.  प्रा. भाविकट्टी यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, प्रा. डॉ. जी. व्ही. माळी यांनी अभिनंदन केले. प्रा. भाविकट्टी या कोल्हापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष  श्रीशैल मठपती यांच्या  पत्नी आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes