Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
डिजिटल इम्युनिटी उपक्रम टप्प्याटप्प्याने राज्यात राबविणारमहाविकास आघाडीचे पदवीधर – शिक्षकचे उमेदवार कर्तृत्ववान - खासदार सुप्रिया सुळेराज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहनएआयच्या युगात वाचनसंस्कृती जपणे काळाची  गरज : डॉ. युवराज दीक्षितमंत्र्यांचे विधान चर्चेत, खोटं बोललं की देवी अंगावर उठते ! महायुतीचे नेते सौंदत्ती डोंगरावर, ठरावधारकांचा मेळावा अन् यल्लम्मा देवीची शपथ !!छछ डडशिवाजी विद्यापीठाच्या ४६ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचे जनरल चॅम्पियनशीप विवेकानंद कॉलेजकडेप्रा. भारती भाविकट्टी यांना शिवाजी विद्यापीठाची पीएचडीजिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेत डीआरके कॉलेजची प्राजक्ता रणदिवेचे यशकौस्तुभ गावडेंचा सोलापुरात प्रचाराचा धडाका, माळशिरसमध्ये मेळावा !महायुतीच्या नेत्यांची एकजूट अधोरेखित! !

जाहिरात

 

डिजिटल इम्युनिटी उपक्रम टप्प्याटप्प्याने राज्यात राबविणार

schedule17 Oct 26 person by visibility 12 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी -: महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने 'डिजिटल इम्युनिटी' हा उपक्रम सुरू केला आहे. महाराष्ट्रासाठी पथदर्शी ठरणाऱ्या या उपक्रमाद्वारे शालेय विद्यार्थी, महिला व शिक्षकांमध्ये सायबर सुरक्षितता, सुरक्षित डिजिटल व्यवहार, सोशल मीडियाचा जबाबदार वापर, आणि सायबर फसवणुकीबाबत जनजागृती केली जात आहे.  पथदर्शी उपक्रमाचा सविस्तर आढावा जिल्हा परिषद कोल्हापूर येथे आयोजित बैठकीत घेण्यात आला.  कोल्हापूर जिल्ह्यात यशस्वी ठरलेला हा उपक्रम टप्प्याटप्प्याने संपूर्ण महाराष्ट्रात राबविला जाणार आहे.

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत राजर्षी शाहू छत्रपती स्मारक येथे चार जुलै रोजी या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला होता. दरम्यान जिल्हा परिषदेत आयोजित आढावा बैठकीला महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे उपस्थित होत्या. त्यांनी या उपक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांमध्ये सायबर फसवणूक, ओटीपी फसवणूक, फिशिंग आणि एआयच्या सुरक्षित वापराबाबत आढावा घेतला.  ​या प्रसंगी जिल्हा कार्यक्रमाधिकारी नितीन मस्के, जिल्हा महिला बालविकास अधिकारी सुहास वाईंगडे, शिक्षणाधिकारी अशोक घुगे, कक्ष अधिकारी संजय जाधव आदी  उपस्थित होते.  ​डिजिटल माध्यमांचा सुरक्षित व जबाबदार वापर व्हावा आणि सायबर गुन्ह्यांपासून विद्यार्थी व महिलांचे संरक्षण व्हावे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes