Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
छछ डडशिवाजी विद्यापीठाच्या ४६ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचे जनरल चॅम्पियनशीप विवेकानंद कॉलेजकडेप्रा. भारती भाविकट्टी यांना शिवाजी विद्यापीठाची पीएचडीजिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेत डीआरके कॉलेजची प्राजक्ता रणदिवेचे यशकौस्तुभ गावडेंचा सोलापुरात प्रचाराचा धडाका, माळशिरसमध्ये मेळावा !महायुतीच्या नेत्यांची एकजूट अधोरेखित! ! पदवीधरांच्या प्रश्नासाठी लढणारा मी कार्यकर्ता, राष्ट्रवादीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकावर ढकलूमहाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचा कौस्तुभ गावडेंना पाठिंबाना कुटंबांतील सदस्याला उमेदवारी…ना स्वीकृत संचालकपदासाठी नातेवाईकांची दावेदारी ! कार्यकर्त्यांना सोबत घेऊन गोकुळची लढाई !!महायुतीचे दोन्ही उमेदवार अभ्यासू, शिक्षणाविषयी तळमळ असणारे !  पहिल्या फेरीत विजयी करूया !! हसन मुश्रीफपदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीत वाद, शिवसेना ठाकरे पक्षाचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षावर हल्लाबोल ! ठाकरेंचे फोटो वापरल्यास कायदेशीर कारवाई ! !

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठाच्या ४६ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचे जनरल चॅम्पियनशीप विवेकानंद कॉलेजकडे

schedule16 Oct 26 person by visibility 11 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी  :  शिवाजी विद्यापीठाच्या मध्यवर्ती ४६ व्या युवा महोत्सव २०२६–२७ मध्ये विवेकानंद कॉलेज, कोल्हापूरच्या विद्यार्थी कलाकारांनी विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली आहे.  मुधोजी महाविद्यालय फलटण येथे झालेल्या 46 व्या शिवाजी विद्यापीठाच्या युवा महोत्सवांमध्ये विवेकानंद महाविद्यालयास वैयक्तिक व सांघिक स्पर्धांमध्ये जनरल चॅम्पियनशिप मिळविली. शिवाजी विद्यापीठ युवा महोत्सवात सलग १८ वर्षे अव्वल येण्याचा बहुमान पटकावला.  

     या युवा महोत्सवात –  लोककला – प्रथम क्रमांक , एकपात्री अभिनय – प्रथम क्रमांक,  प्रहसन – प्रथम क्रमांक , शास्त्रीय सुगम गायन – प्रथम क्रमांक , शास्त्रीय तबलावादन – प्रथम क्रमांक , पाश्चिमात्य एकल गायन – प्रथम क्रमांक, एकांकिका - प्रथम क्रमांक, भारतीय समुहगीत – प्रथम , शास्त्रीय सुरवाद्य – प्रथम , शास्त्रीय तालवाद्य – प्रथम, पाश्चिमात्य एकल गायन – प्रथम, पाश्चिमात्य एकल वादन - द्वितीय. याशिवाय इतर विविध स्पर्धांमध्ये द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त झालेला आहे.

संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते सांस्कृतिक विभागातील या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.  याप्रसंगी बोलताना त्यांनी गेली अठरा  वर्षे विवेकानंद महाविद्यालय शिवाजी विद्यापीठ युवा महोत्सवामध्ये जनरल चॅम्पियनशीप पटकावत आहे. ही संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे. ’अशा शब्दांत कौतुकोद्गार काढले. कार्याध्यक्ष साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, प्राचार्य मिलिंद हुजरे यांनी सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. आरिफ महात , सदस्य्‍  डॉ राजश्री पाटील, प्रा संदीप पाटील, डॉ.संपदा टिपकुर्ले, प्रा सतीश उपळावीकर, प्रा. एच.व्ही.चामे,  संगीत शिक्षक  महेश हिरेमठ,  सुधर्म देसाई यांचे अभिनंदन करण्यात आले.  डॉ. सी. बी. पाटील, डॉ. एकनाथ आळवेकर, श्री हितेंद्र साळुंखे, रजिस्ट्रार एस के धनवडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes