राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन
schedule17 Oct 26 person by visibility 10 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धांना यंदा १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धांमधील नाटकांचे परीक्षण करण्यासाठी नाट्य क्षेत्रातील अनुभवी कलाकारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत हौशी मराठी नाट्य स्पर्धा, हौशी हिंदी नाट्य स्पर्धा, संस्कृत नाट्य स्पर्धा, संगीत नाट्य स्पर्धा, मराठी बालनाट्य स्पर्धा, दिव्यांग बालनाट्य स्पर्धा, मराठी एकांकिका स्पर्धा तसेच मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धा आदी विविध राज्यस्तरीय नाट्य स्पर्धांचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. यंदाच्या राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांचे परीक्षण करण्यासाठी नाट्य क्षेत्रातील कलाकारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. इच्छुक कलाकारांना २५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. ऑनलाइन अर्ज तसेच यासंदर्भातील अधिक माहितीसाठी mahanatyaspardha.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. पात्र व अनुभवी नाट्य कलाकारांनी या संधीचा लाभ घेऊन मुदतीत अर्ज सादर करावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.