एआयच्या युगात वाचनसंस्कृती जपणे काळाची गरज : डॉ. युवराज दीक्षित
schedule17 Oct 26 person by visibility 15 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी -: ‘ कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वाढत्या वापरामुळे माहिती सहज उपलब्ध होत असली, तरी सखोल ज्ञान, स्वतंत्र विचारक्षमता, कल्पनाशक्ती आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी वाचन अत्यावश्यक आहे. पुस्तकांच्या वाचनामुळे विचारांना दिशा मिळते, ज्ञानाचा विस्तार होतो आणि चिकित्सक दृष्टिकोन विकसित होतो,’ असे मत डॉ. युवराज दीक्षित यांनी केले.
वाचन प्रेरणा दिनानिमित्त शहीद सीताराम पाटील लायब्ररीच्या वतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. विद्यार्थ्यांनी डिजिटल माध्यमांचा विवेकपूर्ण वापर करत नियमित वाचनाची सवय जोपासावी, असे आवाहनही त्यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रशांत पालकर होते. यावेळी सर्वाधिक वाचन करणाऱ्या विद्यार्थ्याचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच सर्वाधिक संशोधन पेपर तयार करणाऱ्या प्रा. स्नेहल कुलकर्णी यांनाही प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. ग्रंथपाल संग्राम किल्लेदार यांनी प्रास्ताविक केले. वैष्णवी खोत यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अविनाश पालकर यांनी आभार मानले. यावेळी प्राचार्य हिमांशू चव्हाण, उपप्राचार्य सागर शेटगे ग्रंथपाल दिगंबर कोराणे, तनुजा पाटील उपस्थित होते.