महाविकास आघाडीचे पदवीधर – शिक्षकचे उमेदवार कर्तृत्ववान - खासदार सुप्रिया सुळे
schedule17 Oct 26 person by visibility 12 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: ‘पुणे विभागीय शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर व हर्षदा देशमुख -जाधव हे अभ्यासू आणि कर्तृत्ववान आहेत. या दोन्ही निवडणुका महाविकास आघाडी ताकतीने लढवत आहे. या निवडणुका जिंकू ही. प्रत्येकजण पास होण्यासाठी लढत असतो, या निवडणुकीतही आम्ही पास होऊ.’असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सु्प्रिया सुळे यांनी व्यक्त केला. पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ खासदार सुळे या शुक्रवारी, कोल्हापुरात होत्या. त्यांनी, कार्यकर्त्याच्यासोबत आढावा बैठक घेतली. शेतकऱ्यांशी निगडीत विषय सरकार गांभीर्य घेत नाही. शक्तीपीठ माहामार्गसाठी एक लाख कोटी रुपये खर्च आहेत, मात्र कष्टकरी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. अशी टीकाही त्यांनी केली. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, माजी आमदार राजीव आवळे, शारंग पाटील, अश्विनी माने, पद्मा तिवले, रोहित पाटील आदी उपस्थित होते.