Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मार्केट यार्डातील व्यापार-व्यावसायिकांची सामाजिक बांधिलकी, स्वखर्चातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतकुंभार काम करणा-यांना महापालिकेचा परवाना आवश्यकमहाराष्ट्र न्यूज वनची पाच वर्षाची यशस्वी वाटचाल ! व्हिजीटर्सची संख्या एक कोटीच्या घरात !!देशभरातील उद्योग जगतासाठी केआयटीच्या अभियंत्यांनी योगदान द्यावे - सचिन मेननशिवाजी विद्यापीठ तंत्रज्ञान अधिविभाग अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेसाठी अधिकृत स्क्रूटिनी सेंटरगर्भाशयाचा कर्करोग प्रतिबंध लसीकरण- शालेय विद्यार्थ्यांच्या डोळे तपासणीची मोहीमशक्तिपीठ महामार्ग रद्द करू दे, मुख्यमंत्र्यांना सदबुद्धी मिळू दे ! पंढरीच्या विठुरायाला साकडे !! रोटरी क्लब होरायझनच्या अध्यक्षपदी सुमित बिरंजे, सचिवपदी अभिनंदन‌ वणकुद्रे कृती समितीचा नारा, आधी हद्दवाढ-मग महापालिका निवडणुका !भविष्यात गोकुळचे गाय दूध गोव्यात थेट ग्राहकांपर्यंत ! चेअरमनसह संचालकांची मुख्यमंत्री सावंत यांच्यासोबत चर्चा !!

जाहिरात

 

धनंजय महाडिकांकडून कबड्डीपटूंना बक्षीसाचे बोनस ! बारा खेळाडूंना प्रत्येकी दहा हजार प्रदान !!

schedule18 May 25 person by visibility 257 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कबड्डीत यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि सुदृढ आरोग्य लागते. खेळाडूंनी ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्याचं ध्येय ठेवावं, नियमित सराव करावा, त्यातून निश्चितच यश मिळेल, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.

 ठाणे इथं झालेल्या ७२ व्या राज्य कबड्डी अजिंक्य स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. दरम्यान खासदार महाडिक यांनी १२ खेळाडूंना प्रत्येकी १० हजार रुपयांचे बक्षीस प्रदान केले. तुषार पाटील, दादासो पुजारी, ओंकार पाटील, आदित्य पवार, साईप्रसाद पाटील, सौरभ फगरे, साहिल पाटील, अविनाश चारापले, अवधूत पाटोळे, सौरभ इंगळे, धनंजय भोसले, सर्वेश करवते, संघ प्रशिक्षक शहाजान शेख, व्यवस्थापक प्रा. संदीप लवटे यांचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

दरम्यान स्पर्धेतील अंतिम सामन्यात कोल्हापूर आणि आहिल्यानगर संघाची गाठ पडली. चार वेळा विजेत्या ठरलेल्या अहिल्यानगर संघाला धुळ चारत, कोल्हापूरने अजिंक्यपद पटकावले. कोल्हापूर जिल्हा संघातील खेळाडू आणि प्रशिक्षकांचा विशेष सत्कार झाला. प्रा शेखर शहा यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी स्पष्ट केली. कोल्हापुरात कबड्डीसाठी दर्जेदार क्रीडांगण असावं, तसच खेळाडूंना चांगल्या सोयी - सुविधा मिळाव्यात, अशी अपेक्षा प्रा. डॉ. रमेश भेंडीगिरी यांनी व्यक्त केली. शंकर पोवार यांनी स्पर्धेचं अहवाल वाचन केलं. प्रा संभाजी पाटील आणि प्रा रमेश भेंडीगिरी यांनी कबड्डीसाठी आयुष्यभर परिश्रम घेतले. त्यामुळं कोल्हापुरात अनेक खेळाडू घडल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं. मुंबई, पुण्याच्या धर्तीवर कोल्हापुरातही कबड्डी मैदान साकारलं जाईल. त्यासाठी केंद्र आणि राज्य पातळीवरून निधी मंजूर करून आणू, असा महाडिक यांनी व्यक्त केला. यावेळी ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कृष्णात पाटील, शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, विलासराव खानविलकर, अण्णा गावडे, वर्षा देशपांडे, उमा भोसले - भेंडीगिरी उपस्थित होते.

 

 

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes