शक्तिपीठ महामार्ग रद्द करू दे, मुख्यमंत्र्यांना सदबुद्धी मिळू दे ! पंढरीच्या विठुरायाला साकडे !!
schedule04 Jul 25 person by visibility 77 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : राज्यातील शेतक-यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी व राज्यातील जनतेवर अन्यायकारक असणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सदबुध्दी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुचावी. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी व आमदार सतेज पाटील , खासदार प्रणिती शिंदे यांनी पंढरपूर येथील पांडूरंगास साकडे घातले.
मुख्यमंत्री फडणवीस ६ जुलै रोजी पंढरपूर येथे पांडुरंगाची सपत्नीक शासकीय पूजा करणार आहेत. या पुजेच्या आधी मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीत दिलेला राज्यातील शेतक-यांचा सात बारा कोरा करून कर्जमुक्तीच्या निर्णयाची तातडीने अमलबजावणी करावी. तसेच राज्यातील जनतेवर व शेतक-यावर अन्यायकारी ठरणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुध्दी सुचावी या मागणीसाठी पंढरपुरात शेतक-यांनी गर्दी केली होती.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सर्व शेतकरी एकत्रित येत विठ्ठल मंदिरासमोरील नामदेव पायरीवर पांडुरंगास अभिषेक घालून साकड घालण्यात आले. शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे , युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष दामोदर इंगोले, परभणी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार , सम्राट मोरे , महेश खराडे , अनिल पवार , पोपट मोरे , धनाजी पाटील , विठ्ठल मोरे , शशिकांत खोत , सचिन शिंदे , तानाजी बागल , धनंजय महामुलकर , विजय रणदिवे , राजाराम देसाई उपस्थित होते.