शिवाजी विद्यापीठ तंत्रज्ञान अधिविभाग अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेसाठी अधिकृत स्क्रूटिनी सेंटर
schedule04 Jul 25 person by visibility 23 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : केंद्रीय प्रवेश प्रक्रिया (सीईटी 2025) अंतर्गत अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी शासनाकडून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या तंत्रज्ञान अधिविभागास अभियांत्रिकी प्रवेशासाठी अधिकृत स्क्रूटिनी सेंटर म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या केंद्रामार्फत रजिस्ट्रेशन, कागदपत्रांची पडताळणी, त्रुटी निवारण, तसेच पुढील सर्व प्रवेश प्रक्रिया अशी सर्व सेवा मोफत मिळणार आहे. तंत्रज्ञान अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ येथे प्रत्यक्ष येऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन तंत्रज्ञान अधिविभागाचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. अजित कोळेकर यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंगच्या प्रथम वर्ष प्रवेश, थेट द्वितीय वर्ष प्रवेश, एम.टेक. अभ्यासक्रम, शिष्यवृत्ती योजनांचे मार्गदर्शन, तसेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत मिळणाऱ्या विविध संधी व फायदे याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेसाठी अधिकृत व विश्वासार्ह मार्ग निवडत शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभाग केंद्राचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी ०२३१२६०९४२४ येथे संपर्क साधावा.