कृती समितीचा नारा, आधी हद्दवाढ-मग महापालिका निवडणुका !
schedule04 Jul 25 person by visibility 38 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी आठ गावांच्या समावेशाची प्रक्रिया जलदगतीने करावी यासाठी हद्दवाढ कृती समितीने महापालिकेसमोर धरणे आंदोलन केले. सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत झालेल्या आंदोलनात विविध संघटना, संस्थांच्या प्रतिनिधींनी आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा दिला.‘आधी हद्दवाढ-मग महापालिका निवडणुका’ अशा घोषणा दिल्या. तसेच हद्दवाढीच्या निर्णयाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना घेराव घालण्याचा इशारा दिला.
‘आधी हद्दवाढ-मग महापालिका निवडणुका, हद्दवाढ कोणासाठी-तुमच्या आमच्या भल्यासाठी’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार, बाबा इंदूलकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, माजी नगरसेवक भूपाल शेटे, आदींची भाषणे झाली. कोल्हापूर शहराची आधी हद्दवाढ करा, मग निवडणुका घ्या अशी भूमिका मांडण्यात आली.
स्थायी समितीचे माजी सभापती राजू लाटकर, अशोक भंडारे, ईश्वर परमार, प्रतिज्ञा उत्तुरे, किशोर घाटगे, दिलीप देसाई, संदीप देसाई, अनिल घाटगे, राजू जाधव, सुभाष देसाई, संभाजीराव जगदाळे, सतीश कांबळे, दिलीप पवार, रघुनाथ कांबळे, तौफिक मुल्लाणी, सुनील देसाई, चंद्रकांत भोसले, भरत काळे, संजय शेटे, धनंजय दुग्गे, महादेव पाटील, अॅड. प्रमोद दाभाडे, ईश्वर चन्नी, फिरोज सरगुर, संजय पटकारे आदी उपस्थित होते.