रोटरी क्लब होरायझनच्या अध्यक्षपदी सुमित बिरंजे, सचिवपदी अभिनंदन वणकुद्रे
schedule04 Jul 25 person by visibility 26 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ होरायझनच्या अध्यक्षपदी सीए सुमित बिरंजे, सचिवपदी अभिनंदन वणकुद्रे, खजानिसपदी आर्किटेक श्रीधर काळभैरव यांची निवड करण्यात आली. २०२५-२६ या वर्षासाठीचा पदग्रहण समारंभ नुकताच झाला., हा या क्लबचा १८वा पदग्रहण समारंभ आहे. मावळते प्रेसिडेंट रो. डॉ. विकास पाटील, सेक्रेटरी रो. अर्जुनसिंह पवार आणि ट्रेझरर रो. अमित चौगुले यांनी नूतन अध्यक्ष बिरंजे, सचिव वणकुद्रे आणि ट्रेझरर काळभैरव यांच्याकडे पदाची सूत्रे सोपविली. या प्रसंगी २०२५-२६चे असिस्टंट गव्हर्नर रो. हर्षवर्धन तायवडे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. बिरंजे यांनी २०२५-२६ या रोटरी वर्षासाठी निलंबन राबविल्या जाणाऱ्या समाजसेवा आणि सांस्कृतिक उपक्रमांची माहिती दिली. इन्स्टॉलेशन ऑफिसर रो. देवराज नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते पदग्रहण समारंभ पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला गतवर्षीचे सेक्रेटरी पवार यांनी २०२४-२५ मध्ये झालेल्या उपक्रमांचा अहवाल मांडला. विकास पाटील, यांनी त्यांच्या कारकीर्दीचा आढावा घेतला. इन्स्टॉलेशन ऑफिसर नूतन असिस्टंट गव्हर्नर, प्रेसिडेंट, सेक्रेटरी व ट्रेझरर यांचा परिचय रो. सुशील पवार, रो. प्रमोद सूर्यवंशी, रो. विशाल माने आणि रो. सागर बकरे यांनी उपस्थितांना करून दिला.या सोहळ्याचे सूत्रसंचालन पंकज पवार आणि सुप्रिया चिकोडी यांनी केले.
या पदग्रहण समारंभाला रो. राहुल कुलकर्णी, रोटरी क्लब ऑफ हॉरायझनचे माजी प्रेसिडेंटस, मावळते बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, क्लब सदस्य आणि रोटरी मुव्हमेंट ऑफ कोल्हापुर २०२५-२६ चे प्रतिनिधी उपस्थित होते.