Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सहकारातूनच मानवी जीवनाचा खऱ्या अर्थाने विकास : प्राचार्या वर्षा मैंदर्गीनूतन मराठी विद्यालय हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना रोटरी हेरिटेजचे बळराज्यातील एमफिल प्राध्यापकांना न्याय, पंचवीस वर्षाचा प्रश्न निकालीमार्केट यार्डातील व्यापार-व्यावसायिकांची सामाजिक बांधिलकी, स्वखर्चातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतकुंभार काम करणा-यांना महापालिकेचा परवाना आवश्यकमहाराष्ट्र न्यूज वनची पाच वर्षाची यशस्वी वाटचाल ! व्हिजीटर्सची संख्या एक कोटीच्या घरात !!देशभरातील उद्योग जगतासाठी केआयटीच्या अभियंत्यांनी योगदान द्यावे - सचिन मेननशिवाजी विद्यापीठ तंत्रज्ञान अधिविभाग अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेसाठी अधिकृत स्क्रूटिनी सेंटरगर्भाशयाचा कर्करोग प्रतिबंध लसीकरण- शालेय विद्यार्थ्यांच्या डोळे तपासणीची मोहीमशक्तिपीठ महामार्ग रद्द करू दे, मुख्यमंत्र्यांना सदबुद्धी मिळू दे ! पंढरीच्या विठुरायाला साकडे !!

जाहिरात

 

मार्केट यार्डातील व्यापार-व्यावसायिकांची सामाजिक बांधिलकी, स्वखर्चातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत

schedule05 Jul 25 person by visibility 31 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ते तिघेही व्यापारी. कोण धान्य व्यापारी तर कोण कांदा बटाटा विक्रीचा होलसेल व्यापार करणारे. व्यापार-व्यवसाय सांभाळत त्यांच्यापैकी दोघांनी बाजार समितीवरही प्रतिनिधीत्व केले. व्यवसाय सांभाळत असतानाच त्यांनी सामाजिक बांधिलकी मानून समाजातील गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करत आहेत. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक कुमार आहुजा, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे मानद सचिव वैभव सावर्डेकर आणि व्यावसायिक महेश डी वारके यांनी एकत्रितपणे जवळपास २०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणार आहेत.

आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे, बाजार समितीचे सभापती प्रकाश देसाई, सचिव धनाजी दळवी व संचालकांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कोल्हापुरात शनिवारी, पाच जुलै २०२५ रोजी  दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम होत आहे. बाजार समिती जवळील मल्टिपर्पज हॉल येथे आयोजित या कार्यक्रमाला समाजातील विविध मंडळी उपस्थित राहणार आहेत. पाचवी ते आठवीतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप होणार आहे. नववी व दहावीतील विद्यार्थ्यांना गणवेश,वह्या, पुस्तके वितरित करण्यात येणार आहेत. माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बाजार समिती संचालक कुमार आहुजा हे दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात. यापूर्वी त्यांनी धान्य वाटप, कोव्हिड काळात वैद्यकीय मदत केली आहे. त्यांच्या या सेवाभावी उपक्रमाला यंदा बाजार समितीचे माजी संचालक वैभव सावर्डेकर, व्यावसायिक महेश वारके यांनी योगदान दिले. तिघांनी मिळून विद्यार्थ्याना पाठबळ देण्याचे ठरविले. शा. कृ. पंत  वालावलकर हायस्कूल, ज्ञानगंगा विद्यालय व प्रिन्स शिवाजी विद्यामंदिरमधील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याचे ठरविले. स्वखर्चातून त्यांचा हा उपक्रम आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes