महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर सीए शाखा आणि विद्यार्थी संघटना यांच्यावतीने ७६ व्या सीए दिनाच्या निमित्ताने एक जुलै २०२४ रोजी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सीए दिनानिमात्त दाभोळकर कॉर्नर आयसीएआय भवन, कोल्हापूर येथे रक्तदान शिबिराचे होत आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून कोल्हापूर सीए शाखेने याचे आयोजन केले आहे. नागरिकांनी आणि विद्यार्थी मित्रांनी याला प्रतिसाद द्यावा असे आवाहन सीए शाखेमार्फत अध्यक्ष सीए तस्लिम अरिफ मुल्लाणी यांनी केले आहे.