+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार
Screenshot_20240226_195247~2
schedule16 Aug 22 person by visibility 322 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी कोल्हापूर : मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना - भाजप हिंदुत्ववादी सरकारने सर्व उत्सव निर्बंधमुक्त केल्याने राज्यात दहीहंडी उत्सव भव्य प्रमाणात साजरा होणार आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शाखा छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्र मंडळ यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही  "भगवी दहीहंडी" चे आयोजन केले आहे.सोबत लाखो रुपयांची बक्षिसे  देण्यात येणार आहेत असे संयोजकांनी कळविले आहे.
 या दहीहंडीकरिता प्रथम क्रमांकाचे १ लाख ५० हजार रुपये व मानपत्र बक्षीस ठेवण्यात आले आहे. यासह सलामीसाठी, थरांसाठी रोख रक्कमांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत महिलांसाठी खास "खेळ पैठणी" चा स्पॉट गेमसह आकर्षक बक्षिसेही उपस्थित महिलांना देण्यात येणार आहे. यासह नृत्याविष्कार सादर करण्यात येणार आहे. सर्वात वर असणाऱ्या गोविंदाचा सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आली आहे. दहीहंडी कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी ढोल ताशा पथक असेल. दहीहंडीच्या सुरवातीस श्री शाहू गर्जना ढोल वाद्य पथकाकडून सलामी दिली जाणार आहे. दहीहंडीचे उद्घाटन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांच्या हस्ते दि.१९ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी चार वाजता "छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोल्हापूर" येथे होणार आहे.
  दहीहंडीचे संयोजन शाखाप्रमुख आणि मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कपिल केसरकर, अध्यक्ष राहुल अपराध, अमित जाधव, रुपेश डोईफोडे, अभिलाष चव्हाण, सागर शिंदे, उदय शिंदे, जयाजी घोरपडे, केदार भुर्के, शाहरुख बागवान,  निहाल मुजावरसह शिवसेना शाखा छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.