+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule20 Jul 24 person by visibility 180 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : दर्जेदार दूध व दुग्धजन्य पदार्थ आणि  महालक्ष्मी पशुखाद्य यासाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळने आता आयुर्वेदिक उत्पादनात पाऊल टाकले आहे. दूध उत्पादकांच्या जनावरांच्या विविध आजारांचा प्रतिबंध व उपचारांसाठी गोकुळ हर्बल पशूपूरक उत्पादने सुरू केली आहेत. गडमुडशिंगी येथील श्री महालक्ष्मी पशुखाद्य कारखानाय येथे हा प्रकल्प सुरू केला आहे.अशी माहिती गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. हा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प ठरला आहे. 
 नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या सहकार्याने गोकुळने हा प्रकल्प उभारला आहे. गोकुळच्या हर्बल पशुपूरक प्रकल्पाचे उद्घाटन, सोमवारी २२ जुलै २०२४ रोजी होणार आहे. महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना गडमुडशिंगी येथे हा कार्यक्रम होत आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. असल्याचे चेअरमन डोंगळे व संघाचे डॉ.विजय मगरे यांनी दिली.
 एक कोटी २६ लाख रुपये इतका प्रकल्पाचा खर्च आहे. या प्रकल्पाची उत्पादन क्षमता प्रतिदिन ४०० किलो इतकी आहे. पहिल्या टप्प्यात सहा प्रकारच्या हर्बल पशूपूरक उत्पादनांची निर्मिती होणार आहे. या प्रकल्पासाठी एनडीडीबीचे अनुदान तीस टक्के ( ३७ लाख ८४हजार ) आहे. तर गोकुळचा हिस्सा सत्तर टक्के (८८ लाख ३० हजार रुपये) आहे. 
   हर्बल पशूपूरक उत्पादने आणि पुरवठा साखळी सुविधा या योजनेंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. यामध्ये नैसर्गिकपणे सहज उपलब्ध असणाऱ्या औषधी वनस्पती व स्वयंपाक घरातील दररोजच्या वापरातील विविध (कोरफड, हळद, चुना, हाडजोड, कढिपत्ता, लिंबू, ,तुळस, लसूण, जिरे, लोणी, तूप, मोहरी, तीळ, तेल, गुळ, शेवगा, पाने, मुळा, लाजाळू पाने, तमालपत्र, विड्याची पाने, काळी मिरी, मोठे मीठ, निंबोळी, घाणेरी पाने, खसखस, हिंग आदी) मसाल्यांचे पदार्थांचा वापर करून अॅलोव्हेरा ज्यूस, हळद चूर्ण, ज्वरशामक, पंचामृत, पाचक, ट्रायसो (ट्रायसोडिअम सायट्रेट) या सहा हर्बल पशुपूरक उत्पादनांची निर्मिती सुरु केली जाणार आहे.
 गोकुळच्या या हर्बल उत्पादनांमुळे जनावरांच्या स्तनदाह, कासेला सूज येणे, सडाला चिराभेगा, चामखिळ, अपचन, गाभण न राहणे, माजावर न येणे, ताप येणे, लाळ खुरकत, लम्पी, सांधे सूज, खोकला, विषबाधा, गोचीड, जनावरास उठता न येणे अशा विविध आजारावर खात्रीशीर आयुर्वेदिक उपचार करणे सहज सुलभ होणार असून या प्रकल्पाद्वारे उत्पादित होणाऱ्या हर्बल पशुपूरक उत्पादनांचा वापर करून दूध उत्पादकांनी या उपचार पद्धतीचा अवलंब करावा असे आवाहन केले आहे.