+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule20 Jul 24 person by visibility 92 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांच्या जयंती दिवशीच वाळवा तालुक्यातील एकमेव विधी महाविद्यालयास राज्य सरकारकडून मंजूरी मिळाली आहे. महात्मा फुले शिक्षण संस्था, उरुण-इस्लामपूर यांच्या जनरल सेक्रेटरी  श्रीमती सरोज नारायण पाटील  यांनी याबाबतची माहिती दिली. याबाबतचा प्रस्ताव संस्थेमार्फत  राज्य सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे सादर करण्यात आला होता.
या महाविद्यालयास  तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमास तथा नवीन महाविद्यालास मान्यता प्राप्त झाली. महाविद्यालयाची प्रवेश क्षमता ६० इतकी असणार आहे. या विधी महाविद्यालयाकरीता कोणत्याही विद्याशाखेमधून पदवी प्राप्त केलेला विद्यार्थी  राज्य सरकारच्या सीईटी सेल मार्फत प्रवेश मिळवू शकणार आहे. दरम्यान महाविद्यालय सुरु करण्याबाबतच्या काही तांत्रिक बाबींच्या पूर्ततेची प्रक्रिया आता सुरु झाली आहे, प्रस्तुत प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून प्रत्यक्ष पहिल्या टप्प्यातील प्रवेश सुरु होतील.