+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule24 Jun 24 person by visibility 171 categoryक्रीडा
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,  कोल्हापूर : थायलंड येथे होणाऱ्या कनिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी 
लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय साई कुस्ती संकुल मुरगूड ची कुस्तीगीर अमृता पुजारी ची ७२ किलो वजन गटामध्ये भारतीय कुस्ती संघात निवड झाली. १६ ते २४ जुलै २०२४ या कालावधीत स्पर्धा होणार आहे.
नोएडा स्टेडियम,नोएडा या ठिकाणी आज सुरू असलेल्या भारतीय कुस्ती संघाच्या कनिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धेसाठीच्या निवड चाचणी मध्ये  सेमी फायनल मध्ये दिल्लीच्या तन्नु वरती दुहेरी पट हे टेकनिक करत अमृताने चिटपटीने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत हरियाणाच्या आंतरराष्ट्रीय पदक विजेती मंजू कुमारी हिच्या बरोबरच्या अटीतटीच्या लढतीत ०४ - ०३ अशा गुणाधिक्याने विजय मिळवत अमृताने भारतीय कुस्ती संघामध्ये आपले स्थान पक्के केले 
 जून महिन्यातील भारतीय कुस्ती संघाच्या वेगवेगळ्या निवड चाचणीतून दोन आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची अमृताने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. 
 अमृताची वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी जॉर्डन या देशात होणाऱ्या स्पर्धेसाठी पण निवड झालेले आहे.