+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule15 Jul 24 person by visibility 285 categoryआरोग्य
दहा हजार वृक्ष लावण्याची घातली अट
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापुरात येणार आहेत. सीपीआर इमारतीचे भूमिपूजन व कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येण्याचे निमंत्रण त्यांनी स्वीकारले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे झालेल्या जनसन्मान मेळाव्यात जाहीररीत्या ही माहिती दिली.       
उपमुख्यमंत्री पवार यांनी केंद्रीय मंत्री शहा यांना भेटल्याचे सांगितले या भेटीत त्यांनी निमंत्रण स्वीकारल्याचे सांगितले. तसेच; वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांना शेंडा पार्कमधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात दहा हजार वृक्ष लावण्याचे नियोजन करा, असा निरोप देण्यासही सांगितले. जुलै महिन्याच्या अखेरीस किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात हा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.  यापूर्वी पालकमंत्री  मुश्रीफ यांनी शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत भूमिपूजन व कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची विस्तारीत नूतन इमारत या दोन इमारतींच्या उद्घाटनासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा येणार असल्याचे जाहीर केले होते. काल बारामती येथे झालेल्या जनसन्मान मेळाव्यामध्ये दस्तूरखुद्द उपमुख्यमंत्री  पवार यांनी या संदर्भाचा उल्लेख केला. ............     
सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल.....!           
कोल्हापुरात शेंडा पार्कमध्ये ३० एकरांत एक हजार कोटींचे १,१०० बेडचे अद्ययावत हॉस्पिटल होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते लवकरच भूमिपूजन होणार आहे. या अद्ययावत हॉस्पिटलमध्ये ६०० बेडचे सामान्य रुग्णालय व बाह्य रुग्ण विभाग, २५० बेडचे कॅन्सर हॉस्पिटल आणि २५० बेडचे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल होणार आहे.        
============