+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार
Screenshot_20240226_195247~2
schedule26 Dec 22 person by visibility 354 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
भारतातील शल्य चिकित्सकांची शिखर संघटना असलेल्या ‘असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया’च्या (एएसआय) सचिवपदी कोल्हापूर सर्जिकल सोसायटीचे ऍडव्हाजरी मेंबर व डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, कोल्हापूरच्या डिपार्टमेंट ऑफ सर्जरीचे सहयोगी प्रा. डॉ. प्रतापसिंह वरुटे यांची सलग दुसऱ्यांदा निवड झाली आहे. 32,068 सदस्य असलेल्या या संघटनेच्या ८४ वर्षाच्या कालखंडात महाराष्ट्रातून सचिवपदी निवड होणारे ते पहिलेच सर्जन आहेत.
 डॉ. वरुटे यांनी सर्जरीच्या विषयक अनेक परिसंवाद, कार्यशाळा, थेट शस्त्रक्रिया प्रक्षेपण कार्यशाळा, वैद्यकीय शिक्षण परिषद अशा अनेक व्यासपीठावर सहभाग घेतला आहे. महाराष्ट्र शल्यचिकित्सकांची वार्षिक परिषद २०१६, कोविड काळात ऑनलाईन प्लँटफॉर्मवर २० पेक्षा जास्त कार्यशाळा आयोजित केल्या. याचीच पोचपावती म्हणून भारतीय शल्यचिकित्सकांनी डॉ. प्रतापसिंह वरूटे यांची महाराष्ट्रातून या पदी निवड केली. या कार्यकाळात त्यांनी भारतीय शल्यचिकित्सकांसाठी विविध उपयुक्त योजनांचा अवलंब करायचे ठरवले आहे.
डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा, सुप्रीटेंडेंट डॉ. वैशाली गायकवाड, उपकुलसचिव संजय जाधव, डिपार्टमेंट ऑफ सर्जरीचे विभाग प्रमुख डॉ. शीतल मुरचीटे, कोल्हापूर सर्जिकल सोसायटी अध्यक्ष डॉ. नमिता प्रभू, सचिव डॉ. सौरभ गांधी, खजानीस डॉ. सागर कुरुणकर तसेच डॉ. आप्पासाहेब मेमोरियल हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. वसुंधरा वरूटे यांनी डॉ. वरुटे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.