Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
डॉ बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायमन्यू एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी निर्मल लोहिया, उपाध्यक्षपदी नितीन वाडीकर, नेमचंद संघवीशाहू स्मारक भवनमध्ये लोकराजांवरील चित्रमय प्रदर्शनसुनील कदम,शारंगधर देशमुखसह २५ नगरसेवक शिवसेनेत ! काँग्रेससोबत भाजप, राष्ट्रवादीलाही झटका !!शिरीष सप्रे प्रथम स्मृतीदिनानिमित्त गुरुवारी पुस्तक प्रकाशन, सांगितीक कार्यक्रमकलाकार ओंकार भिसेच्या कुटुंबासाठी एकवटले संवेदनेचे हातमाहिती अधिकार कार्यकर्ता जयराज कोळीला खंडणी स्वीकारताना अटककोल्हापुरात राष्ट्रवादीचे नगरसेवक शिवसेनेच्या गळाला, खेडकरांनी जिंकलीय पाच वेळा निवडणूकभाजप कोल्हापूरतर्फे श्यामाप्रसाद मुखर्जींना अभिवादन, आणीबाणीतील सत्याग्रहींचा सन्मानस्वतःच्या आवडीचे करिअर निवडा, यशस्वी भविष्य घडवता येते : रविंद्र खैरे

जाहिरात

 

अजित पवारांनी बोलावली सोमवारी उच्च शिक्षणाशी निगडीत विषयासंबंधी बैठक, प्राध्यापक भरतीचा विषय ऐरणीवर

schedule08 Aug 21 person by visibility 1774 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : उच्च शिक्षणाशी निगडीत विविध प्रलंबित विषयासंबंधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात सोमवारी (ता. ९ ऑगस्ट) बैठक होत आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री मंत्री उदय सामंत यांच्यासह उच्च शिक्षण व अर्थ विभागाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित असणार आहेत. यामुळे अपेक्षा उंचावल्या आहेत. दुसरीकडे या बैठकीत प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक होणार की चर्चेच्या फेऱ्याभोवती बैठक राहणार असा प्रश्न उच्च शिक्षण क्षेत्रातील मंडळी करत आहेत.
राज्यभर प्राध्यापकांची पदे मोठया संख्येने रिक्त आहेत. प्राध्यापक पदाची भरती न झाल्यामुळे बहुतांश कॉलेजमधील भिस्त ही तासिका तत्वावरील प्राध्यापकांवर आहे. मात्र तासिका तत्वावरील प्राध्यापकांना तुटपुंजे मानधन आहे. मार्च २०२० पासून कोरोना महामारीमुळे कॉलेज बंद आहेत. कॉलेज बंद असल्यामुळे तासिका तत्वावरील प्राध्यापकांना काम नाही. मानधन नाही. त्यांची अवस्था बिकट बनली आहे. प्राध्यापक पदाची रिक्त भरावीत ही त्यांची प्रमुख मागणी आहे. यासाठी प्राध्यापक भरतीसाठी नागपूर, पुणे येथे लक्ष्यार्थ आंदोलन झाले. १९ जुलेपासून सुरू असलेले लक्ष्यार्थ आंदोलन नागपूरमध्ये सुरू आहे. संबंधितांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री सामंत, उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेऊन निवेदनही दिले आहे.
दुसरीकडे राज्यभरातील शैक्षणिक संस्थांनी प्राध्यापक पदे भरावीत अशी मागणी सरकारकडे केली आहे. शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी, शिवाजी विद्यापीठ प्राचार्य असोसिएशनने राज्य सरकारकडे विविध मागण्यासाठी पाठपुरावा केला आहे. प्राध्यापक भरती, सीएचबी प्राध्यापकांच्या मानधनात वाढ, नियुक्तीस परवानगी यासाठी पत्रव्यवहार केला आहे. विद्यापीठ विकास आघाडीतर्फे मागण्यांचे निवेदन सरकारकडे पाठविले आहे.
शिक्षक व शिक्षकेत्तरपद भरतीसाठी परवानगी मिळावी, बिगर नेट सेट प्राध्यापकांना त्यांचे लाभ व निवृत्ती वेतन मिळावे, महावि्दयालयीन व विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पूर्वलक्षी प्रभावाने पूर्ववत लागू करावे, एमफील असलेल्या प्राध्यापकांना कॅसचे लाभ देणे, सीएचबी तत्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ, महाविद्यालयीन इमारतीना वीज बिल, पाणीपट्टी घरगुती दराप्रमाणे आकारणी करावी असे विविध विषय प्रलंबित आहेत.
सोमवारी होणाऱ्या बैठकीला पाच शिक्षक आमदार उपस्थित असणार आहेत. पुणे विभागीय शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर, शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीचे सहसचिव प्राचार्य व्ही. एम. पाटील बैठकीत सहभागी होणार आहेत. उपमुख्यमंत्री पवार यांच्या कार्यालयात दुपारी २.४५ मिनिटाला बैठक होत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes