शरण साहित्य अध्यासनासाठी दीड कोटींची प्रशासकीय मान्यता कुलगुरूंना प्रदान
schedule07 Oct 24 person by visibility 173 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या शरण साहित्य अध्यासनातून बसवेश्वर महाराजांच्या जीवनकार्याचा विचार प्रचार व प्रसार होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या अध्यासनासाठी जिल्हा नियोजन मंडळामध्ये एकूण तीन कोटी रुपये मंजूर निधी मंजूर आहे. त्यापैकी दीड कोटींची प्रशासकीय मान्यता पालकमंत्री मुश्रीफ यांनी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. डी. टी. शिर्के यांच्याकडे दिली.
मंत्री मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून कोल्हापूरात शिवाजी विद्यापीठात महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जीवनाचा अभ्यास, त्यांचे विचार- कार्याचा प्रचार आणि प्रसारासाठी "शरण साहित्य अध्यासन" ला मंजुरी मिळाली. जिल्हा नियोजनकडून मंजूर तीन कोटी निधीपैकी दीड कोटी निधी तात्काळ वर्ग केला आहे.त्यानुसार दीड कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. शरण अध्यासनासाठीचा उर्वरित निधीही लवकरच प्रदान केला जाईल. तसेच; त्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही मुश्रीफ यांनी दिली. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे उपस्थित होते.