+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule24 Jul 24 person by visibility 305 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शिवनेरी गडावरील शिवाई देवीच्या मंदिरात ठेवलेल्या छत्रपती  शिवरायांच्या पादुकांचे श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात हक्कदार श्री पूजक मंडळाच्यावतीने स्वागत व पादुकांवर मंत्रघोषात अभिषेक करण्यात आला.
शिवजन्मभूमी गड शिवनेरी येथील शिवाई देवीच्या मंदिरात छत्रपती शिवरायांच्या धातूच्या पादुका स्थापित केलेल्या आहेत. 1995 पासून दरवर्षी या पादुका पालखी मिरवणुकीने पन्हाळा ते पावनखिंड मोहिमेत सहभागी होण्यासाठी शिवभक्त घेऊन येतात. यावर्षी प्रथमच या पादुका वाडी रत्नागिरी येथील श्री ज्योतिर्लिंग मंदिर म्हणजे ज्योतिबा मंदिर आणि श्री करवीर निवासिनी मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. मोहिमेचे समन्वयक डॉ. संदीप महिंद आणि त्यांचे सहकारी कृष्णा भोसले, राजेश भोजे, उमेश दहिने आणि विनायक सुतार या पादुका घेऊन मंदिरात आले. मंदिराच्या विद्यापीठ हायस्कूलकडील दरवाजा जवळ श्रीपूजक मंडळाचे सचिव माधव मुनिश्र्वर, सहसचिव अजित ठाणेकर, केदार मुनिश्र्वर, ऐश्वर्या मुनिश्र्वर आणि अनिकेत अष्टेकर यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पादुका व पादुका सोबत असलेली तलवार गर्भगृहात नेण्यात आली व तेथे पादुकांचा श्री करवीर निवासिनी मूर्तीचा चरण स्पर्श करून विधीवत पूजन करण्यात आले. तेथे आठवडेकरी श्री पूजक श्री मुनिश्र्वर आणि धनश्री मुनिश्र्वर यांचेकडून पादुकांना मानाचा शेला अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित श्री पूजक, भाविक आणि देवस्थान समितीच्या कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे 'जय भवानी जय शिवाजी', 'अंबामाता की जय', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' घोषणा देऊन गर्भगृह दणाणून सोडले. त्यानंतर अभिषेक मंडपात सचिन ठाणेकर, सचिन गोटखिंडीकर, मोहन गोटखिंडीकर, योगेश जोशी, नितीन सांगवडेकर, शाम पुरोहित, ,संजय फलटणकर, हरिभाऊ झिरळे आदींनी पादुका व शिवमुर्तीवर  अभिषेक केला. त्यानंतर काही काळ पादुका भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्या. यावेळी देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, व्यवस्थापक महादेव दिंडे, सुरक्षा पर्यवेक्षक संदीप साळोखे, सरदार पाटील, पुरोहित ओंकार भोरे, सुदाम सांगले यांच्यासह अनेक कर्मचारी आणि भाविकांनी दर्शन घेतले. त्यानंतर पादुका मस्तकी धारण करून मंदिराची परिक्रमा पूर्ण करण्यात आली व पादुका पुढील कार्यक्रमासाठी मार्गस्थ झाल्या.