+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule12 Jul 24 person by visibility 182 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : वाढदिवस म्हटलां की डामडौल, फटाक्यांच आतषबाजी आणि शहरभर पोस्टरबाजी असं जणू समीरकण बनत चाललं आहे. मात्र या साऱ्या प्रकाराला फाटा देत वाढदिवसाला विधायक उपक्रमांची जोड देण्याचा पायंडा श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी पाडला आहे. समाजोपयोगी उपक्रमासाठी लोकसहभाग घडवित वंचितांच्या जीवनात आनंद फुलविणारी त्यांची संकल्पना वाखाणण्याजोगी आहे.
यंदाही त्यांनी, वाढदिवसाचे औचित्य साधून ‘एक शालेय गणवेश, गरीब विद्यार्थ्यांसाठी’ हा उपक्रम राबविला. वाढदिनादिवशी अर्थात नऊ जुलै रोजी,  ५० गरीब मुलांना गणवेश वितरित केले. पंधरा ऑगस्ट २०२४ रोजी ५०० विद्यार्थ्यांना गणवेश वितरित करण्यासाठी श्र महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट प्रयत्नशील आहे. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी त्यांनी दानशूर व्यक्ती व समाजमनाला साद घातली आहे. एका गरीब विद्यार्थ्यांसाठी ३०० रुपयेचे अर्थसहाय्य करुन नागरिक या उपक्रमात सहभागी होऊ शकतात.
लोकसहभागातून जमलेल्या रकमेतून गरीब कुटुंबांतील ५०० विद्यार्थ्यांना गणवेश वितरित होणार आहे. एका गणवेशासाठी त्यांनी नागरिकांना ३०० रुपये जमा करण्याचे आवाहन केले आहे. या ३०० रुपये व्यक्तिरिक्त गणवेशासाठी जी जादा रक्कम लागणार आहे त्या रकमेची जबाबदारी श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट करणार आहे. यंदा, मधुरिमाराजे छत्रपती यांच्या हस्ते ‘एक शालेय गणवेश, गरीब विद्यार्थ्यांसाठी’ या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. मेवेकरी हे गेली काही वर्षे वाढदिवसाला एक समाजोपयोगी उपक्रम राबवित आहेत.
चार-पाच वर्षापूर्वी त्यांनी, क्रांती फाऊंडेशन संचलित दिव्यांग मुलांच्या शाळांसाठी पोषण आहार देण्यास सुरुवात केली. गेली पाच वर्षे हा उपक्रम सुरू आहे. त्यानंतर पुढील वर्षी वाढदिवसाचे औचित्य साधून पंचगंगा हॉस्पिटलमधील रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत जेवणाचे डबे देण्यास सुरुवात केली. हा उपक्रमही आताही सुरू आहे. गेल्या वर्षी, वाढदिवसाला, ‘गरीब विद्यार्थ्यांना गणवेश’ प्रदान केले. यंदा, या उपक्रमाला व्यापक स्वरुप देत लोकसहभागातून ५०० विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे ठरविले आहे. नागरिकांना या उपक्रमासाठी ३१ जुलै २०२४ पर्यंत देणगी देता येणार आहे.