+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule30 May 24 person by visibility 293 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : तपोवन मैदानाजवळील ओम ऑर्थोपेडिक हॉस्पिटलने जैव वैद्यकिय कचरा तपोवन परिसरामध्ये टाकल्याचे निर्दशनास आल्याने आरोग्य घनकचरा विभागामार्फत पन्नास हजार दंड करण्यात आला. कारवाई सहायक आयुक्त कृष्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील विभागीय आरोग्य निरीक्षक ऋषिकेश सरनाईक, मुकादम राकेश पाटोळे व खलिद शेख यांनी केली.
 महापालिकेमार्फत शहरातील सर्व वैद्यकिय व्यवसायिकांना जाहीर नोटीसद्वारे वैद्यकिय आस्थापनेतून (हॉस्पिटल, क्लिनिक व लॅब) मध्ये निर्माण होणारा जैव वैद्यकिय कचरा इतरत्र कोठेही न टाकता कोल्हापूर महापालिकेच्या अधिकृत वाहनाकडेच देण्याबाबत आवाहन केले होते. 
 दरम्यान गुरुवारी 30 मे 2024 रोजी ओम हॉस्पिटलने जैव वैद्यकिय कचरा तपोवन परिसरामध्ये टाकलेचे निर्दशनास  आले. यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आले आहे. कोल्हापूर शहरातील व शहराबाहेरील सर्व वैद्यकिय व्यवसायिकांना आवाहन केले आहे की वैद्यकिय व्यवसायिकांनी त्यांच्या आस्थापनामध्ये निर्माण होणारा जैव वैद्यकिय कचरा कोल्हापूर महापालिकेने अधिकृत केलेल्या वाहनांकडेच जमा करावा. अन्यथा  कचरा इतरत्र उघडयावर, नाल्यामध्ये टाकलेचे निदर्शनास आल्यास संबंधित आस्थापनेवर जैव वैद्यकिय कचरा व्यवस्थापन व नियंत्रण अधिनियम 1998 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल असे महापालिकेने म्हटले आहे.