+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule07 Jul 24 person by visibility 131 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापुरात गुणवत्तेला कमतरता नाही, कोल्हापूरच्या औद्योगिक विकासासाठी सर्वांनी मिळून सर्वोत्तम प्रयत्न करत राहू, असे प्रतिपादन खासदार शाहू महाराज यांनी व्यक्त केले. कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचा ७७ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी असोसिएशनकडून कोल्हापूर जिल्ह्याच्या उद्योग क्षेत्राशी निगडीत निवेदन  शाहू महाराज यांना देण्यात आले. शाहू महाराज यांनी राज्य आणि केंद्र पातळीवर पाठपुरावा करू, असे आश्वस्त केले.
कोल्हापूरचे औद्योगिक क्षेत्र आणखी विस्तारण्यासाठी मोठ्या उद्योगाची मागणी, तसेच प्रशस्त जागेची मागणी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे संचालक दिनेश बुधले यांनी खासदार शाहू महाराज यांच्याकडे केली. शाहू महाराज यांनी नव्या एमआयडीसीला प्रशस्त जागा मिळण्यासाठी एकत्रित काम करू आणि त्यासाठी पाठपुरावा करु, असे सांगितले. 
दरम्यान, असोसिएशनचे अध्यक्ष बाबासो कोंडेकर यांच्या हस्ते असोसिएशनतर्फे खासदार झाल्याबद्दल शाहू महाराज यांचा सत्कार करण्यात आला.
  यावेळी असोसिएशनचे सेक्रेटरी  प्रदीप व्हरांबळे आणि पीआरओ  प्रशांत मोरे यांचा चांगल्या कामगिरीबद्दल शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास  कमलाकांत कुलकर्णी, प्रसन्न तेरदाळकर, श्रीकांत दुधाणे, दिनेश बुधले, संजय अंगडी, नितीन वाडीकर, अतुल आरवाडे,अभिषेक सावेकर, अमर करांडे, जयदिप मांगोरे, सुनिल चव्हाण, सुरेंद्र जैन, हरिशचंद्र धोत्रे, संजय शेटे, सागर जाधव, दिपक मिरजे, मोहन कुशिरे, सुनिल चव्हाण, विजेंद्र चरणे, शामसुंदर देशिंगकर, संगिता नलवडे, नंदकुमार नलवडे, सुभाष चव्हाण, बाबुभाई हुदली.,देवेंद्र ओबेराय  उपस्थित होते.