बुधवारच्या शाळा बंद आंदोलनात ४६ संघटनांचा सहभाग, जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा !!
schedule23 Sep 24 person by visibility 433 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शाळा व शिक्षकांंशी निगडींत विविध शैक्षणिक प्रश्नांंची सरकारने तातडीने सोडवणूक करावी, कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द करावा आणि मार्च २०२४ मधील संचमान्यतेचा आदेश मागे घ्यावा यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शाळा बुधवारी, (२५ सप्टेंबर २०२४) बंद ठेवण्यात येणार आहेत. या आंदोलनासाठी ४६ संघटना एकवटल्या आहेत. यादिनी शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे. आंदोलनात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनांचा सहभाग आहे.
कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व शिक्षण संस्था चालक संघटना यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी शिवाजी पार्क येथील मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवन येथे बैठक झाली. याप्रसंगी आमदार जयंत आसगावकर यांनी मार्गदर्शन केले. शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस डी. लाड हे अध्यक्षस्थानी होते.
मुख्याध्यापक संघाचे सचिव सचिव आर. वाय. पाटील, प्रा.सी. एम.गायकवाड, भरत रसाळे, बी. जी. बोराडे, शिवाजी माळकर, राजाराम वरूटे, प्रसाद पाटील, संभाजी बापट, रविकुमार पाटील, सुनिलकुमार पाटील, अमर वरुटे, सदानंद शिंदे,तुषार पाटील, जयंत पाटील, सर्जेराव सुतार, संदीप पाडळकर, बी. एस. पाटील, नेताजी कमळकर, सुभाष कलागते, मनोहर जाधव, एस एस बोरवडेकर, प्रमोद ताैंदकर, सुधाकर निर्मळे, सुधाकर सावंत, उमेश देसाई, संतोष आयर आदी उपस्थित होते. सरकारच्या चुकीच्या शैक्षणिक धोरणाविरोधातील लढा यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला.
................
आंदोलनात सहभागी संघटना .........
महामोर्चात मुख्याधापक संघ, संस्था चालक संघ, शिक्षक भारती,म. रा. कायम विनाअनुदान शाळा संघटना,म. रा. शाळा कृती समिती, खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती, कोल्हापूर महानगर माध्य. शिक्षक संघ, शिक्षक परिषद, कनिष्ट महाविद्यालय शिक्षक संघ, प्राथमिक शिक्षक संघ ( पाटील गट ), प्राथमिक शिक्षक संघ (थोरात गट), स्वाभिमानी शिक्षक संघ, प्राथमिक शिक्षक समिती, पुरोगामी शिक्षक संघटना, शिक्षक सेना, शारिरीक शिक्षक संघटना, डीएड सेवक संघटना, प्रयोग शाळा कर्मचारी महासंघ, शासकिय तांत्रिक माध्य. कर्मचारी संघ, शिक्षण संघर्ष संघटना, पदवीधर शिक्षक संघ, कास्ट्राईब शिक्षक संघटना, जुनी पेन्शन हक्क संघटना, स्वयंम अर्थसाहय्य शाळा कृती समिती, सुटा, व्यवसाय शिक्षक संघ, डि. बी. पाटील विचार मंच, महानगर पालिका प्राथमिक शिक्षक समिती, खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघ, अखिल भारतीय शिक्षक संघ, डीसीपीएस संघटना, महानगर पालिका शिक्षक संघ, मागासवर्गिय शिक्षक संघटना, कोल्हापूर जिल्हा माध्य. कर्मचारी व शिक्षक संघ, आश्रम शाळा शिक्षक संघटना, विभागिय शिक्षण संस्था संघ, माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर सेवक संघ, महाविद्यालयीन प्राचार्य संघटना, पालक संघटना, अपंग शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सेवा संघ, इंग्लिश मेडियम स्कूल असोसिएशन, कोल्हापूर जिल्हा माध्य. शिक्षक संघ आदी ४६ संघटना कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ अंतर्गत आंदोलनात उतरल्या आहेत.