+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार
Screenshot_20240226_195247~2
schedule13 Sep 22 person by visibility 1040 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : स्विमिंग हबतर्फे येत्या १५ ते १८ सप्टेंबर या कालावधीत आयोजित यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत ५३८ खेळाडूंनी नोंद केली आहे. गुरुवारी (ता.१५ सप्टेंबर) सायंकाळी पाच वाजता स्पर्धेचे उद्घाटन आहे अशी माहिती संयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील राजर्षी शाहू कॉलेज परिसरातील सागर जलतरण तलाव येथे स्पर्धा होणार आहे. स्विमिंग हबचे पदाधिकारी समीर चौगले, उमेश कोडोलीकर, किरण भोसले, रमेश मोरे आणि भाउ घोडके यांनी पत्रकार परिषदेत या स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असल्याचे सांगितले. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी. टी. शिर्के, महापालिकेच्या प्रशासक कादंबरी बलकवडे, सरोज एन. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी विविध जिल्ह्यातून २६० मुली व २७८ मुलांनी सहभाग नोंदविला आहे. आठ ते २१ वर्षे पर्यंतच्या खेळाडूंचा सहभाग आहे. जलतरणच्या १३४ प्रकारामध्ये स्पर्धा होणार आहे. स्पर्धेसाठी टचपॅडचा वापर करण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या खेळाडूंना मेडल व प्रमाणपत्र देउन सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धा पाच ग्रुपमध्ये होणार आहे. स्पर्धेत एकूण ५० हजार रुपयांची रोख बक्षीसे देण्यात येणार आहेत. चॅम्पियशिपकरिता रोख पाच हजार रुपये, यशवंतराव चव्हाण यांची पूर्णाकृती ट्रॉफी, कृष्णाकाठ पुस्तक, प्रमाणपत्र असे बक्षीसाचे स्वरुप आहे. १८ सप्टेंबरला दुपारी तीन वाजता बक्षीस समारंभ आहे.