+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule19 Jul 24 person by visibility 137 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 
कोल्हापूरातील उद्योजकांना परदेशात त्यांची उत्पादने निर्यात करण्यासाठी अमर्याद संधी आहेत. यासाठी गर्जे मराठी या ग्रुपतर्फे तीन व चार ऑगस्ट २०२४ रोजी , कन्व्हेशन अॅण्ड एक्स्पोझिशन सेंटर, न्यूजर्सी अमेरिका येथे एक्सलन् समेटचे आयोजन केले आहे. या समेटची माहिती येथील उद्योजकांना देण्यासाठी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन येथे माहितीपर चर्चासत्राचे आयोजन केले होते. 
 कोल्हापूरातील ३५  मराठी उद्योजकांचा एक ग्रुप या समेटसाठी पाठविण्याचे उद्दिष्टय ठरविण्यात आले आहे.  समेटमध्ये कोल्हापूरातील उत्पादानाचे स्वतंत्र दालन करण्यात येणार असून ते आकर्षणाचे केंद्र असणार आहे. गर्जे मराठी ग्रुपचा सक्रिय सहभाग या समेटमध्ये असून अमेरिकेतील मराठी उद्योजक, विद्यार्थी यांचेही सहकार्य मिळणार आहे.  
 या पार्श्वभूमीवर आयोजित चर्चासत्रात  मदार सतेज पाटील, उपाध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी, सेक्रेटरी प्रसन्न तेरदाळकर, संचालक श्रीकांत दुधाणे,दिनेश बुधले, हर्षद दलाल,नितीन वाडीकर, हरिशचंद्र धोत्रे,अमर जाधव, सचिन पाटील, दिपेन सबनीस, अमित बच्चे,विशाल मंडलीक, धिरज म्हेत्रे, अशोकराव जाधव, सुरेश मंडलिक, सन्मती रनदिवे, राहूल पाटील, अजित कोठारी, शांताराम सुर्वे, दिलावर शेख, हर्षवधन जी, ओकांर देशपांडे, सुशिल हंजे, ओकांर पोळ अमर  जाधव आदी सहभागी झाले. 
 चर्चासत्रात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अमेरिकेतून आनंदगाणू, प्रमोद अत्तरडे, ललित शिंदे अमेरिका यांनी समेटबद्दल माहिती दिली. माधव दाबके (मुंबई) यांनी संस्थेच्या भारतात सुरू असलेल्या कार्याबद्दल माहिती देऊन सर्व मराठी जणांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.  गरजे मराठी ग्लोबलचे सातारा येथील प्रतिनिधी  सर्जेराव पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला.  कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन तर्फे डिजीटल अॅपच्या माध्यमातून उद्योजकांची डिरेक्टरी ओंकार पोळ यांचे सहकार्याने  केली आहे.  प्रदीप व्हरांबळे यांनी यांनी सूत्रसंचालन केले.