+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule13 Jul 24 person by visibility 109 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ग्रामीण भागाचा विकास व्हावा, लोकांचे जीवनमान सुधारावे, पाण्यापासून आरोग्यापर्यंत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी केंद्र सरकार लाखो रुपयांची तरतूद करते. पंधराव्या वित्त आयोगातून गावांना लोकसंख्येच्या प्रमाणानुसार लाखो रुपयांपासून कोटींपर्यंत निधी मिळाला. मात्र गावातील राजकारण, योजनांच्या अभ्यासाचा अभाव, अंमलबजावणीत निष्क्रियता आणि निकष पूर्ण करण्यासाठी असक्षम यामुळे कोट्यवधी रुपये निधी विना खर्च पडून आहे. पंधरा वित्त आयोगाची अंमलबजावणी झाल्यापासून अर्थात २०२० -२१ ते जून २०२४ अखेर कमी खर्च झालेल्या ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेने नोटीसा काढल्या आहेत. करवीर तालुक्यातील १८ गावात कमी खर्च झाला आहे. यामुळे १८ ग्रामपंचायती आणि सतरा ग्रामसेवकांना याप्रकरणी खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीच्या खर्चाचा पोलखोल होणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी या विषयात लक्ष घातल्यामुळे ग्रामपंचायती खडबडून जागे झाले आहेत. पहिल्या टप्प्यात करवीर तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींनी गेल्या चार वर्षात कमी प्रमाणात निधी खर्च केल्याची माहिती आहे. यामध्ये सरनोबतवाडी (१८ टक्के निधी खर्च), म्हाळुंगे ( २१ टक्के निधी खर्च), हलसवडे (२५ टक्के निधी खर्च) , नंदगाव ( २९टक्के निधी खर्च), कुडीत्रे (३० टक्के निधी खर्च), महे (३० टक्के निधी खर्च), गडमुडशिंगी ( ३३ टक्के निधी खर्च), न्यू वाडदे ( ३६ टक्के निधी खर्च), चिंचवाड ( ३७ टक्के निधी खर्च), आंबेवाडी ( ३७ टक्के निधी खर्च), बेले ( ३८ टक्के निधी खर्च), शिये ( ४० टक्के निधी खर्च), रजपूतवाडी ( ४० टक्के निधी खर्च), चिखली ( ४१ टक्के निधी खर्च), तामगाव ( ४२ टक्के निधी खर्च), नागाव ( ४२ टक्के निधी खर्च), आमशी ( ४२ टक्के निधी खर्च), कुरुकली (४३ टक्के निधी खर्च)या गावच्या ग्रामपंचायती व ग्रामवसेवकांना नोटीसा काढल्या आहेत. सरनोबतवाडीने तर केवळ १८ टक्के निधी खर्च केला आहे.
सरनोबतवाडीसाठी ८६ लाख १३ हजार ६१ रुपयांची तरतूद आहे. यापैकी केवळ १५ लाख ९ हजार ६६१ रुपये खर्च आहेत. म्हाळुंगे ग्रामपंचायतीला ९९ लाख ३९ हजार २७६ रुपयांची तरतूद आहे. आणि खर्च केवळ वीस लाख ९२ हजार ३३७ रुपये आहे. निधी उपलब्ध असूनही नियोजनाच्या अभावी शिल्लक रकमेचे प्रमाण मोठे आहे. हलसवडेसाठी ५९ लाख २ हजार ८१२ रुपयांची तरतूद आहे. त्यापैकी खर्च केवळ चौदा लाख ९० हजार ९४४ रुपये झाला आहे. नंदगावसाठी एक कोटी १९ हजार ११६ रुपयांची तरतूद असताना चार वर्षात केवळ २९ लाख २१ हजार २०६ रुपये खर्ची पडले आहेत. अन्य गावातही खर्चाचे प्रमाण कमी आहे.