राहुल गांधी दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर, राज्यस्तरीय नेतेही येणार
schedule30 Sep 24 person by visibility 285 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे चार आणि पाच ऑक्टोबर 2024 या कालावधीत कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. अशी माहिती विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली.
कसबा बावडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण चार ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सहा वाजता राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे. 5 ऑक्टोबर रोजी सकाळी राहूल गांधी हे राजर्षी शाहू समाधीस्थळ येथे भेट देणार आहेत. समाधी स्थळाचे दर्शन झाल्यानंतर ते संविधान सन्मान संमेलनाकडे रवाना होतील. राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापुरात संविधान सन्मान संमेलन होत आहे. या संमेलनासाठी 1000 अधिक निमंत्रित सहभागी होणार आहेत अशी माहिती आमदार पाटील यांनी दिली. राहूल गांधी यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या निमित्ताने राज्यातील काँग्रेसचे नेते मंडळी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्नीथला, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह वरिष्ठ नेते मंडळी कोल्हापुरात येणाऱ्या असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला खासदार शाहू महाराज, आमदार राजू आवळे, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, गोकुळचे संचालक चेतन नरके, करणसिंह गायकवाड, आदी उपस्थित होते,