+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule20 Jul 24 person by visibility 114 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
 डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकची 25 वर्षांची वाटचाल अतिशय कौतुकास्पद आहे. सुमारे १० हजार अभियंते या पॉलिटेक्निकच्या माध्यमातून घडले असून भविष्यात हे कॉलेज आणखी नावलौकिक मिळवेल असा विश्वास डी. वाय पाटील प्रतिष्ठानचे विश्वस्त आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी व्यक्त केला. 
  कसबा बावडा येथील डी वाय पाटील पॉलिटेक्निक रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार पाटील बोलत होते. डी वाय पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, संस्थेचे सचिव श्रीपाद धरणगुत्ती, पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. महादेव नरके, उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेणके आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते केक कापून रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला. 
आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, पंचवीस वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या ही संस्था मोठी करण्यात अनेक माजी प्राचार्य आणि कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. पॉलिटेक्निक नावारूपाला आणण्यासाठी प्राचार्य डॉ. महादेव नरके यांचे मोलाचे योगदान आहे. यशाची घोडदौड अशीच सुरु राहून येत्या काळात पॉलिटेक्निक आणखी नावलौकिक मिळवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
  प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी, पॉलिटेक्निकचे विद्यार्थी हेच आमचे ब्रँड ॲम्बेसिडर असल्याचे सांगितले. संस्थेतून शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज देश आणि जगभरातील नामवंत कंपन्या शासकीय संस्था मध्ये कार्यरत असल्याचा अभिमान आहे. पॉलिटेक्निकच्या सातत्यपूर्ण यशस्वी कामगिरीबद्दल सलगपणे व्हेरी गुड श्रेणी मिळाली आहे.कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यानी पॉलीटेक्नीकच्या प्रगतीबद्दल कौतुक केले 
  डी वाय पाटील पॉलिटेक्निकचे माजी प्राचार्य विनय शिंदे, अभय जोशी, डॉ. सतीश पावसकर यांच्यासह परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या शिवानी यादव, विकीराज माने, पार्थ पाटील यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी विनय शिंदे, अभय जोशी, डॉ. सतीश पावसकर, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेन्ट्रलचे अध्यक्ष संजय भगत, माजी विद्यार्थी विकीराज माने, आमित भोसले, माजी कर्मचारी नीता सूर्यवंशी पाटील, टी. सी. हजारे, एन.डी. देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. मुदगल, डी डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ तळसंदेचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. आर के शर्मा, सी एच आर ओ श्रीलेखा साटम उपस्थित होते.