Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
ढढ जजणतददप्रभात-रॉयल थिएटर बनले पीआर सिनेप्लेक्स, एक पडदा चित्रपटगृहाला मल्टिप्लेक्सचा लूककोल्हापूरचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट-क्षीरसागरांची क्रीडाईच्या पदाधिकाऱ्यांना ग्वाहीआयर्विन ख्रिश्चन हायस्कूलच्या मैदानावर दिसणार  लंडन ब्रिज- युरोपियन स्ट्रीट डॉ. जे. के. पवार यांच्या साहित्यकृतीस राज्य साहित्य विशेष पुरस्कार प्रदानभारतीय कम्युनिस्ट पक्षाचा शताब्दी वर्धापनदिन उत्साहात साजरातपोवन मैदान येथे शुक्रवारपासून सतेज कृषी-पशुपक्षी प्रदर्शनमहिलांनी राजकीय साक्षर बनायला हवे –स्वयंसिद्धाच्या कांचन परुळेकरअवनितर्फे शुक्रवारी शिक्षण हक्क  परिषद

जाहिरात

 

गोकुळच्या बटरची परदेशातील ग्राहकांना भुरळ,४२० मेट्रिक टन लोणीची केली मागणी !!

schedule25 Nov 24 person by visibility 172 categoryउद्योग

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : उच्च प्रतीचं दूध आणि दर्जेदार दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती, ही गोकुळची खासियत. गोकुळच्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची चव साऱ्यांच्याच पसंतीस उतरली. देशातील एक आघाडीची दूध संघ म्हणून गोकुळची ओळख. गोकुळच्या दुग्धजन्य पदार्थांची भुरळ आता परदेशातील नागरिकांना पडलीय. अझरबैझान देशाने गोकुळकडे नव्याने ४२० मेटि्क टन लोणीची मागणी केली आहे.

  अझरबैझानमधील अटेना दूध संघाला गोकुळतर्फे २१० मेट्रिक टन लोणी रवाना कण्यता आले. चेअरमन अरुण डोंगळे व संचालकांच्या उपस्थितीमध्ये वातानुकूलित कंटेनरमधून लोणी पाठविले. याप्रसंगी बोलताना गोकुळचे चेअरमन डोंगळे म्हणाले, ‘गोकुळने पश्चिम आशियातील व पूर्व युरोपातील अरबैझान देशातील बाकू या प्रदेशातील अटेना दूध संघास या पूर्वी ४२ मेट्रिक टन गायीची देशी लोणी निर्यात केले होते. या निर्यात केलेल्या देशी लोण्याची गुणवत्ता व चव अझरबैजान व शेजारील देशातील ग्राहकांना आवडली. 

 गोकुळच्या देशी लोणीला मागणी वाढू लागल्याने अटेना डेअरीने गोकुळकडून पुन्हा एकदा नवीन ४२० टनाची मागणी केली असून यापैकी २१० मे.टन देशी लोणी रवाना केले. या निर्यातीमुळे अतिरिक्त गाय दुधापासून उत्पादित होणारे गायीचे देशी लोणी व दूध भुकटी याची निर्गत होण्यास मदत होणार आहे.

 गोकुळची उत्पादने व त्यांच्या गुणवत्तेबद्दल समाधान व्यक्त करून भविष्यात गोकुळची इतर दुग्धजन्य उत्पादने आयात करण्यास इच्छुक असल्याचे अटेना डेअरी यांच्यावतीने कळविले आहे. याचबरोबर कतार, ब्राझील, आफ्रिका, बांगलादेश या देशातून गोकुळच्या दूध भुकटी व देशी लोणीसाठी मागणी होत आहे.”असे डोंगळे यांनी सांगितले.              

याप्रसंगी ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रटरी प्रदीप पाटील, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, प्रशासन व्यवस्थापक रामकृष्ण पाटील, मार्केटींग व्यवस्थापक हणमंत पाटील, उपेंद्र चव्हाण, लक्ष्मण धनवडे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes