थेट पाईपलाईन योजना म्हणजे कोल्हापूरच्या माथी मारलेला पांढरा हत्ती, सतेज पाटलांनी कोल्हापूरकरांची माफी मागावी
schedule30 Aug 25 person by visibility 338 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : थेट पाईपलाईन योजनेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून या साऱ्या प्रकल्पाची एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे असे भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत सांगितले. प्रा. जयंत पाटील, विजय सूर्यवंशी, अजित ठाणेकर यांच्यासह भाजपच्या नगरसेवकांचे संयुक्तपणे पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना प्राध्यापक पाटील यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला. थेट पाईपलाईन योजनेचा प्रकल्प म्हणजे कोल्हापूरकरांच्या माथी मारलेला पांढरा हत्ती आहे. या योजनेतील गोंधळामुळे आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरकरांची माफी मागावी अशी मागणी ही त्यांनी केली
"थेट पाईपलाईन प्रकल्प आणण्यासाठी आमदारकी पणाला लावली, हा प्रकल्प माझ्यामुळे आला" असे श्रेय घेणाऱ्या आमदार सतेज पाटील यांनी त्यांच्यात नैतिकता असेल तर या प्रकल्पाच्या अपयशाचे आणि ऐन सणासुदीत कोल्हापूरच्या जनतेला होणाऱ्या त्रासाचेही श्रेय घेऊन कोल्हापूरकरांची माफी मागावी . कोल्हापुरात पहिल्यांदाच सणासुदीच्या कालावधीत सलग पाच दिवस शहरवासियांना पाण्यापासून राहावे लागत आहे. त्याला सर्वस्वी जबाबदार योजनेचे श्रेय लाटणारे नेते आहे. असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. थेट पाईपलाईन योजनेच्या प्रकल्पाच्या प्रारंभ पासूनच तज्ञांनी या प्रकल्पाच्या योग्यता आणि उपयुक्तताविषयी शंका व्यक्त केल्या होत्या. अणुशास्त्रज्ञ शिवराम भोजे यांनी सुद्धा थेट पाईपलाईन योजनेच्या प्रकल्पाबद्दल शंका निर्माण केली होती. मुळात 27 महिन्यांमध्ये ही योजना पूर्ण करायचे होते मात्र तब्बल दहा वर्षांनी ही योजना सुरू झाली. पूर्ण क्षमतेने योजना कधीच सुरू झाली नाही. या योजनेचे कोल्हापूर जनतेसमोर सादरीकरण का झाले नाही संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये या योजनेचे सादरीकरण करून तज्ञ लोकांची मते घ्यायला हवी होती मात्र सगळे काही माझ्यामुळेच असा भूमिकेत वागणाऱ्या नेत्यांनी कोणालाही जुमानले नाही. थेट पाईपलाईन योजनेसाठी कोल्हापूरकरांनी अनेक वर्षे लढा दिला मात्र पाटील यांनी हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे असा कांगावा केला. वास्तविक थेट पाईपलाईन योजना मंजुरीसाठी मंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे यांनीही पाठपुरावा केला. आमदार अमल महाडिक यांनी पुढाकार घेऊन या योजनेसाठीच्या एनओसी मिळवून दिले आहे मात्र पाटील हे त्याचे श्रेय कोणालाही द्यायला तयार नाहीत. सगळे काही माझ्यामुळे ही अशी त्यांची मानसिकता आहे.
या योजनेत अनेक ठिकाणी भ्रष्टाचार झाला आहे. दहा लाखात होणाऱ्या पुलाची किंमत तब्बल दोन कोटी लावण्याचा प्रकार भाजपच्या नगरसेवकांनी उघडकीस आणला होता तसेच योजनेसाठी वापरण्यात येणारे पाईपलाईन असो की 30 किलोमीटर वरून रानावनातून आणलेली विद्युत पुरवठा वाहिनी असो आणि गरज नसताना अडचणीत वाढ करणारी 33 केव्हीए प्रणाली वापरलेले असो या प्रत्येक विषयामध्ये तज्ञांनी शंका व्यक्त केल्या होत्या या योजनेचे ठेकेदार व कन्सल्टंट यांना पाठीशी घालण्याचा उद्योग पहिल्यापासून झाला. योजनेचे काम अपूर्ण असतानाच 2017 मध्ये चार मोटारी आणल्या त्याचा सात वर्षे वापर झाला नाही. थेट पाईपलाईन योजना ही शहरवासियासाठी आहे. त्यामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचे राजकारण आणणार नाही. हा प्रकल्प बंद न पडता कार्यक्षमपणे व्यवस्थित चालणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही तांत्रिक पर्यायी सुचित आहोत. त्याचा प्रशासनाने गांभीरणे विचार करावा. तसेच थेट पाईपलाईन योजना पूर्ण क्षमतेने चालू होईपर्यंत शिंगणापूर योजना, कळंबा तलावातील पाणीपुरवठा हे पर्याय पुनर्जीवित करावे अशी मागणी ही या नगरसेवकांनी केली. विद्युत वाहिन्यावर फांद्या पडून या वर्षात तब्बल 18 वेळा पाणीपुरवठा खंडित झाला आहे या विद्युत वाहिन्यांची पंपांची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदार कंपनी व सल्लागार कंपनीचे आहे त्याचा खर्चही त्यांनीच करून द्यायचा आहे. आमदार अमल महाडिक यांनी कोल्हापूरकरांच्या पिण्याच्या पाण्याचा विचार करून भूमिगत विद्युत वाहिनी व नवीन दोन पंप बसवण्याबाबतचा प्रस्ताव सरकारला देणार असल्याचे म्हटले आह. मात्र थेट पाईपलाईन योजनेच्या करारानुसार योजना कार्यान्वित झाल्यापासून पाच वर्षे देखभाल दुरुस्ती संबंधित कंपनीने करायचे आहे. त्यामुळे सरकारी पैशातून नवीन पंप घेण्यापेक्षा त्या कंपनीवरच जबाबदारी निश्चित करायला हवी. तसेच योजना पूर्ण क्षमतेने सुरू न केल्याबद्दल ठेकेदार व सल्लागार कंपनीकडून दंडात्मक वसुली केली पाहिजे असा मुद्दाही मांडला मंत्री हसन मुश्रीफ हे कोल्हापुरातील एक वजनदार नेते आहेत. शेरवाशांना पाच दिवस पाणीपुरवठा झाला नाही म्हणून त्यांनी केवळ खेद व्यक्त न करता करता सगळ्यांना एकत्र करून मार्ग काढायला पाहिजे. एका व्यक्तीच्या अठासापोटी शहरवासीयांना त्रास सहन करावा लागत आहे. योजना अपूर्ण असताना योजना पूर्ण झाली असे सांगून अभ्यंगस्नान करणाऱ्या नेत्यांनी कोल्हापूरकरांची माफी मागितली पाहिजे. या योजनेत भ्रष्टाचार झाला आहे त्याची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचेही नगरसेवकाने सांगितले . पाण्याच्या विषयात आम्ही राजकारण करत नाही. मात्र विरोधकांनी नैतिकता पाळत आणि मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगावे की आपले हात स्वच्छ आहेत. थेट पाईपलाईन योजनेतील त्रुटीवर महापालिका सभागृहात मी अनेकदा सविस्तरपणे बोललो आहे. त्यावेळी एका नेत्यानी मला सभागृहात बोलू देऊ नका असा निरोप नगरसेवकांना दिला होता मात्र सभागृहातील अनेक सदस्यांनी त्यावेळी मला विरोधही केला नाही आणि माझे समर्थन केले नाही.
पत्रकार परिषदेला माजी महापौर दीपक जाधव, माजी नगरसेवक विलास वासकर, आशिष ढवळे, मुरलीधर जाधव राजसिंह शेळके, शेखर कुसाळे , चंद्रकांत घाटगे, किरण नकाते विजय खाडे, उत्तम कोराने, रवींद्र मुतगी, रुपाराणी निकम, प्रदीप उलपे भाग्यश्री शेटके, मनिषा कुंभार, विशाल शिराळे आदी उपस्थित होते